Holi 2022: सचिन तेंडुलकर यांच्याकडून चाहत्यांना होळीच्या खास शुभेच्छा
Happy Holi 2022: होळी (Holi)हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. होळीच्या सणाला होलिका (Holika) दहनानंतर रंगांची होळी खेळली जाते.
Happy Holi 2022: होळी (Holi)हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. होळीच्या सणाला होलिका (Holika) दहनानंतर रंगांची होळी खेळली जाते. होळीच्या निमित्तानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) यांनी त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनचा हा फोटो त्यांच्या चाहत्यांना खूप आवडलाय. या फोटोवर कमेंटचा वर्षाव होत आहे.
होळी निमित्त सचिन तेंडूलकर यांनी आपल्या चाहत्यांसाठी एक फोटो ट्वीट केलाय. या फोटोत सचिन यांdच्या हातात रंगानं भरलेली प्लेट दिसत आहे. या फोटोला सचिन यांनी मजेशीर कॅप्शन दिलंय. तसेच त्यांनी आपल्या चाहत्यांना होळीचे फोटो ट्विट करण्याचे आवाहनही केलंय. सचिनच्या या फोटोला जवळपास 50 हजार लोकांनी लाईक्स केलंय. तसेच
ट्वीट-
सचिन यांच्या फोटोवर चाहत्याकडून अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, त्यांना अनेक लोकांनी होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर, काही लोकांनी त्याचे मैदानावरचे व्हिडिओ ट्वीट केले आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी खेळाडू असलेल्या सचिन यांनी अनेक विश्वविक्रम आपल्या नावावर केले आहेत. यातील काही विक्रम असे आहेत की, ते मोडणे कोणत्याही खेळाडूसाठी कठीण मानलं जातंय. दरम्यान, आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सनंही होळी साजरा करतानाचे फोटो शेअर केले होते. हे फोटोही चाहत्यांना खूप आवडले होते.
हे देखील वाचा-
- IPL 2022 : ...म्हणून धोनी घालतो 'नंबर 7'ची जर्सी; माहीनं स्वतः सांगितलं कारण
- Sharapova and Schumacher : टेनिस स्टार शारापोवा आणि फॉर्म्युला वन रेसर शूमाकर यांच्यावर गुरुग्राममध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल
- TATA IPL 2022: डेव्हिड वॉर्नरसोबत 'हा' स्फोटक फलंदाज देणार सलामी, येथे पाहा दिल्ली कॅपिटल्सचा संभाव्य संघ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha