एक्स्प्लोर

IPL 2022 : ...म्हणून धोनी घालतो 'नंबर 7'ची जर्सी; माहीनं स्वतः सांगितलं कारण

IPL 2022 : महेंद्रसिंह धोनी का घालतो 'नंबर 7'ची जर्सी? हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. अशातच धोनीनं स्वतः या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

IPL 2022 : टीम इंडियाचा माजी कर्णधार कॅप्टन कूल (MS Dhoni) आयपीएलच्या मैदानातही धमाकेदार खेळी करताना दिसून येतो. आयपीएलमध्ये (IPL) धोनीच्या खांद्यावर चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाची कर्णधार पदाची धुरा आहे. ही जबाबदारीही धोनी यशस्वीरित्या पार पाडताना दिसतो. पण सध्या चर्चा रंगली आहे ती, धोनीच्या जर्सीवरील 'नंबर 7'ची. अनेकांना पडलेला प्रश्न म्हणजे, महेंद्रसिंह धोनी नंबर 7ची जर्सी का घालतो? याचं उत्तर स्वतः धोनीनं दिलं आहे. 

चेन्नई सुपर किंग्स (CSK)चा कर्णधार एमएस धोनीनं खुलासा केला आहे की, 'नंबर 7' त्याच्या फार जवळचा आहे. कारण त्याचा जन्म 7 जुलै रोजी झाला होता. त्यामुळेच त्याच्या जर्सीचा नंबर 7 आहे. हा नंबर त्यानं कोणत्याही अंधश्रद्धेला बळी पडून निवडलेला नाही. धोनीनं जेव्हापासून क्रिकेटमध्ये आपला आंतरराष्ट्रीय डेब्यु केला आहे, तेव्हापासूनच त्याच्या जर्सीचा नंबर 7 आहे. धोनीमुळेच 'नंबर 7' हा अनेक चाहत्यांचा आवडता नंबर झाला आहे. 

इंडिया सिमेंट्स, चेन्नई सुपर किंग्जच्या मालकांचा मूळ गटाद्वारे आयोजित एका कार्यक्रमात चाहत्यांशी बोलताना धोनीनं अनेक गोष्टींबाबत माहिती दिली. यावेळी भारताचा माजी कर्णधार धोनीनं नंर 7 का निवडला त्याचंही स्पष्ट कारण सांगितलं. धोनी म्हणाला की, "अनेक लोकांनी सुरुवातीला विचार केला होता की, 'नंबर 7' माझ्यासाठी एक भाग्यशाली अंक आहे. खरं तर यामागील कारण म्हणजे, माझा वाढदिवस 7 जुलैला असतो. सातव्या महिन्यातला सातवा दिवस हे माझ्यासाठी आवडता नंबर आहे. त्यामुळे मी माझ्या जर्सीवर लिहिण्यासाठी माझ्या जन्मतारखेची निवड केली." 

दरम्यान, सध्या क्रिडा रसिकांमध्ये आयपीएलच्या आगामी सीझनबाबत उत्सुकता वाढली आहे. अशातच आयपीएलमधील स्टार संघ सीएसके गेल्या आठवड्यापासून सूरतमध्ये सराव करत आहे. आयपीएलच्या 15व्या सीझनला 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये सामना रंगणार आहे. 

आयपीएल 2022 साठी चेन्नई सुपर किंग्सचं शेड्यूल 

1. 26 मार्च विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (वानखेडे स्टेडियम, मुंबई)
2. 31 मार्च विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई)
3. 3 एप्रिल विरुद्ध पंजाब किंग्स (ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई)
4. 9 एप्रिल विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद (डीव्हाय पाटील स्टेडियम, मुंबई)
5. 12 एप्रिल विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (डीव्हाय पाटील स्टेडियम, मुंबई)
6. 17 एप्रिल विरुद्ध गुजरात टाइटंस (एमसीए स्टेडियम, पुणे )
7. 21 एप्रिल विरुद्ध मुंबई इंडियंस (डीव्हाय पाटील स्टेडियम, मुंबई)
8. 25 एप्रिल विरुद्ध पंजाब किंग्स (वानखेडे स्टेडियम, मुंबई)
9. 1 मे विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (एमसीए स्टेडियम, पुणे )
10. 4 मे विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (एमसीए स्टेडियम, पुणे )
11. 8 मे विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (डीवाई पाटिल स्टेडियम, मुंबई)
12. 12 मे विरुद्ध मुंबई इंडियंस (वानखेड़े स्टेडियम, मुंबई)
13. 15 मे विरुद्ध गुजरात टाइटंस (वानखेड़े स्टेडियम, मुंबई)
14. 20 मे विरुद्ध राजस्थान रॉयल्स (ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई)

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Mahela Jayawardene News : महेला जयवर्धनेने मुंबई इंडियन्सला सोडलं, मुख्य प्रशिक्षकपदाचा दिला राजीनामा; अचानक घेतलेल्या निर्णयाने खळबळ, नीता अंबानी म्हणाल्या...
महेला जयवर्धनेने मुंबई इंडियन्सला सोडलं, मुख्य प्रशिक्षकपदाचा दिला राजीनामा; अचानक घेतलेल्या निर्णयाने खळबळ, नीता अंबानी म्हणाल्या...
IPL 2027 SRH-DC Trade : 10.75 कोटींचा खेळाडू OUT! दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय, हैदराबादशी अदलाबदल, नेमकं कोणाला घेतलं?
10.75 कोटींचा खेळाडू OUT! दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय, हैदराबादशी अदलाबदल, नेमकं कोणाला घेतलं?
Anirudh Ravichander Kavya Maran Wedding Date Confirmed Rumours: काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
Kavya Maran Wedding: हैदराबाद सनरायझर्सची मालकीण काव्या मारनचं लग्न ठरलं; बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकासोबत बांधणार साताजन्माची गाठ
हैदराबाद सनरायझर्सची मालकीण काव्या मारनचं लग्न ठरलं; बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकासोबत बांधणार साताजन्माची गाठ

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Satara News : कुरिअर कंपनीतून एकानं टीप दिली, पुणे बंगळुरु महामार्गावर दरोडा टाकत दीड कोटींचे सोने चांदीचे दागिने लुटले, पोलिसांनी 12 तासात 8 जणांना बेड्या ठोकल्या
पुणे बंगलोर महामार्गावर कवठे गावच्या हद्दीत दीड कोटींचा दरोडा, LCB नं तपासाची चक्र फिरवली, 12 तासात 8 जणांना बेड्या
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
Embed widget