एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

RR vs GT Match Preview : राजस्थान की गुजरात, कोण ठरणार वरचढ? हेड टू हेड आकडेवारीत कुणाचं पारड जड?

Gujrat Titans vs Rajasthan Royals : आज आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) राजस्थान (RR) आणि गुजरात (GT) यांच्यात सामना रंगणार आहे.

IPL 2023 RR vs GT, Match 23 : आज आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये आज डबल हेडरपैकी दुसरा सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि गुजरात टायटन्स (Gujrat Titans) यांच्यात रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) हा रोमांचक सामना (RR vs GT) रंगणार आहे. दोन्ही संघांचा यंदाच्या मोसमातील हा चौथा सामना असेल. आधीच्या चार सामन्यापैकी दोन्ही संघांनी तीन सामने जिंकले असून एका सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. 

IPL 2023, RR vs GT Prediction : राजस्थान विरुद्ध गुजरात

आयपीएल 2023 मध्ये, राजस्थान (Rajasthan Royals) आणि गुजरात (Gujrat Titans) या दोन्ही संघाची आतापर्यंतची कामगिरी चांगली आहे. आयपीएलच्या 16 व्या हंगामात राजस्थान रॉयल्सने चारपैकी तीन सामने जिंकले आहेत. राजस्थान सध्या पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहेत. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धचा त्यांचा मागील सामना जिंकल्यानंतर राजस्थान पहिल्या क्रमांकावर कायम आहे. राजस्थानने यंदाच्या मोसमातील हैदराबाद विरुद्धचा पहिला सामना जिंकला आणि पंजाब विरुद्धचा दुसरा सामना गमावला होता. त्यानंतर दिल्ली विरुद्धच्या तिसऱ्या आणि चेन्नई विरुद्धच्या चौथ्या सामन्यात राजस्थान संघ विजयी ठरला. तसेच गुजरात संघाने यंदाच्या आयपीएलची सुरुवात विजयी सलामी देत केली. त्यानंतर संघाने दिल्लीवरही मात केली. तिसऱ्या सामन्यात मात्र गुजरातचा कोलकाताकडून पराभव झाला. पण पंजाब विरुद्धच्या चौथ्या सामन्यात गुजरात संघ पुन्हा विजयी शर्यतीत परतला.

RR vs GT Head to Head : कुणाचं पारड जड? पाहा काय सांगते आकडेवारी

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये गुजरात टायटन्स (GT) आणि राजस्थान रॉयल्स (RR) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 3 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये गुजरात संघाचं पारड जड दिसून आलं आहे. गुजरात टायटन्सने सर्व तीन जिंकले आहेत. तर, राजस्थान संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही. या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

GT vs RR, IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?

गुजरात टायटन्स (GT) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात 16 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?

आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

MI vs KKR Match Preview : मुंबई मैदान राखणार? कोलकाता कमाल करणार? हेड टू हेड आकडेवारी पाहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget