MI vs KKR Match Preview : मुंबई मैदान राखणार? कोलकाता कमाल करणार? हेड टू हेड आकडेवारी पाहा
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders : आज आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) मुंबई (MI) आणि मुंबई (KKR) यांच्यात रंगणार आहे.
IPL 2023 KKR vs MI, Match : आज आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये आज दोन सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात दुपारी 3.30 वाजता पाहायला मिळणार आहे. मुंबईच्या घरच्या वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) हा रोमांचक सामना (MI vs KKR) रंगणार आहे. दोन वर्षानंतर मुंबई संघाला घरच्या मैदानावर सामना जिंकण्याची संधी आहे. याआधीच्या चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला होता. मुंबई इंडियन्सची आयपीएल 2023 ची सुरुवात निराशाजनक होती. गेल्या सामन्यात पहिला विजय मिळवल्यानंतर संघाला आपली विजयी कामगिरी कायम राखायची आहे.
MI vs KKR, IPL 2023 : मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता
आयपीएल 2023 मध्ये, कोलकाता संघाची आतापर्यंतची कामगिरी मुंबई इंडियन्स संघापेक्षा चांगली आहे. पहिल्या दोन सामन्यातील पराभवानंतर संघाने दिल्ली विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात खातं उघडलं. त्याआधी आयपीएलच्या 16 व्या हंगामाच्या पहिल्या सामन्यात मुंबईचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून आणि दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तर दुसरीकडे कोलकाता संघाची यंदाच्या मोसमाची सुरुवात पंजाब किंग्सकडून पराभवासह झाली. पण केकेआरने आरसीबी विरुद्धचा दुसरा सामना आणि गुजरात विरुद्धचा तिसरा सामना जिंकला. त्यानंतरच्या हैदराबाद विरुद्धच्या सामन्याच मात्र, त्यांचा पराभव झाला.
MI vs KKR Head to Head : कुणाचं पारडं जड? पाहा काय सांगते आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 31 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई संघाचं पारड जड दिसून आलं आहे. मुंबई इंडियन्सने 31 पैकी 22 सामने जिंकले आहेत. तर, केकेआर संघाला फक्त 9 सामने जिंकता आले आहेत. दोन्ही संघांची सर्वाधिक सरासरी धावसंख्या 200 आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
MI vs KKR, IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
मुंबई इंडियन्स (MI) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात 16 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) दुपारी 3.30 वाजता पार पडणार आहे. दुपारी 3 वाजता नाणेफेक होईल.
IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.