एक्स्प्लोर

IPL 2023 : विराट कोहलीची बाजू घेणाऱ्या पत्रकारावर भडकला, गौतम गंभीरच्या ट्वीटने माजवली खळबळ

Gautam Gambhir's Tweet: लखनौ सुपर जायंट्सचा मेंटर गौतम गंभीर याच्या ट्वीटने सोशल मीडियात खळबळ माजवली आहे.

Gautam Gambhir's Tweet: लखनौ सुपर जायंट्सचा मेंटर गौतम गंभीर याच्या ट्वीटने सोशल मीडियात खळबळ माजवली आहे. आरसीबीच्या विराट कोहलीबरोबर झालेल्या बाचाबाचीनंतर गौतम गंभीर याने केलेले हे ट्वीट चर्चेचा विषय आहे. एका न्यूज चॅनलच्या अंकरने विराट कोहली याची बाजू घेत गौतम गंभीर याच्यावर निशाणा साधला होता. प्राइम टाइममध्ये त्यांनी गौतम गंभीर याच्यावर गंभीर टीका केली होती. यावरुनच गौतम गंभीर याने ट्वीट करत निशाणा साधला आहे. यामध्ये गौतम गंभीर याने त्या अँकरचे कुठेही नाव घेतले नाही. पण सोशल मीडियावर लोकांनी तो व्हिडीओ पोस्ट केला आहे.  गौतम गंभीर याच्या ट्वीटची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. 

गौतम गंभीर याने आपल्या ट्वीटमध्ये कुणाचेही नाव घेतले नाही. पण जो मजकूर लिहालाय त्यावरन क्रिकेट चाहत्यांना गंभीरला काय आणि कुणाला म्हणायचे याचा अंदाज लावला आहे. गौतम गंभीर याने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की,  ' दबाव असल्याचे सांगत ज्या व्यक्तीने दिल्ली क्रिकेट सोडून पळ काढला, आता तोच व्यक्ती क्रिकेटबाबत पैसे घेऊन चिंता व्यक्त करत आहे. हाच कलयुग आहे.. जेथे पळपुटे आपली अदालत चालवत आहे' 

गौतम गंभीरचे ट्वीट जसेच्या तसे -

Man who ran away from Delhi Cricket citing “pressure” seems over eager to sell paid PR as concern for cricket! यही कलयुग़ है जहां ‘भगोड़े’ अपनी ‘अदालत’ चलाते हैं।

गौतम गंभीर याच्या ट्वीटनंतर क्रिकेट चाहत्यांनी इंडिया टिव्हीचे अँकर रजत शर्मा यांचा व्हिडीओ पोस्ट करण्यास सुरु केला. त्यामध्ये विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्या वादावर रजत शर्मा यांनी आपले मत व्यक्त केलेय. यामध्ये रजत शर्मा यांनी गौतम गंभीर याचा अंहंकार वाढल्याचे म्हटलेय.  रजत शर्मा म्हणाले की, विराट कोहलीची वाढती लोकप्रियता गौतम गंभीर याला त्रास होतोय. निवडणूक जिंकल्यानंतर गौतम गंभीर याचा अहंकार आणखी वाढलाय. विराट कोहली नेहमीच आक्रमक राहतो.. मैदानावर झालेल्या चुकीच्या गोष्टीला विराट कोहली उत्तर देतो. त्यामुळेच विराट कोहलीने गौतम गंभीर याला उत्तर दिले. पण एकूणच गौतम गंभीर याने केलेले वर्तन एका खासदाराला आणि माजी क्रिकेटपटूला शोभा देत नाही. यामुळे क्रिकेटचे नुकसान होते. 
 
रजत शर्मा इंडिया टीव्हीवर 'आपकी अदालत' नावाचा शो मागील अनेक वर्षांपासून करत आहेत. ते दिल्ली क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष राहिले आहेत. दीड वर्षानंतर रजत शऱ्मा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maha Shivratri : कित्येक वर्ष जुनं मंदिर, अन् पूजेचा तामझाम, पाकिस्तानातील खास महाशिवरात्र! पाहा Exclusive फोटो
कित्येक वर्ष जुनं मंदिर, अन् पूजेचा तामझाम, पाकिस्तानातील खास महाशिवरात्र! पाहा Exclusive फोटो
एकनाथ शिंदे जे म्हणाले तेच सांगत अफगाणिस्तानच्या कोचने ऑस्ट्रेलियाला इशारा दिला, म्हणाला,
एकनाथ शिंदे जे म्हणाले तेच सांगत अफगाणिस्तानच्या कोचने ऑस्ट्रेलियाला इशारा दिला, म्हणाला, "आम्हाला हलक्यात घेऊ नका"
Pune Crime Swargate bus depot: स्वारगेट बस डेपोत तरुणीवर एकदा नव्हे दोनवेळा अत्याचार, मेडिकल रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती उघड
स्वारगेट बस डेपोत अत्याचार झालेल्या तरुणीच्या मेडिकल रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती उघड
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 27 February 2025Special Report | Pakistan Shiv Mandir | पाकिस्तानात बम बम भोले,  कटास राज शिवगंगा मंदिरातून रिपोर्टABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 26 February 2025Special Report Ujjwal Nikam | निकमांकडे वकीलपत्र, तरीही आरोपांचं सत्र;नियुक्तीवर देशमुख कुटुंब समाधानी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maha Shivratri : कित्येक वर्ष जुनं मंदिर, अन् पूजेचा तामझाम, पाकिस्तानातील खास महाशिवरात्र! पाहा Exclusive फोटो
कित्येक वर्ष जुनं मंदिर, अन् पूजेचा तामझाम, पाकिस्तानातील खास महाशिवरात्र! पाहा Exclusive फोटो
एकनाथ शिंदे जे म्हणाले तेच सांगत अफगाणिस्तानच्या कोचने ऑस्ट्रेलियाला इशारा दिला, म्हणाला,
एकनाथ शिंदे जे म्हणाले तेच सांगत अफगाणिस्तानच्या कोचने ऑस्ट्रेलियाला इशारा दिला, म्हणाला, "आम्हाला हलक्यात घेऊ नका"
Pune Crime Swargate bus depot: स्वारगेट बस डेपोत तरुणीवर एकदा नव्हे दोनवेळा अत्याचार, मेडिकल रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती उघड
स्वारगेट बस डेपोत अत्याचार झालेल्या तरुणीच्या मेडिकल रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती उघड
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या नृत्यांगणा; पोलिसांचा फौजफाटा आला
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या नृत्यांगणा; पोलिसांचा फौजफाटा आला
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
Chandrapur News : महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
Embed widget