एक्स्प्लोर

Success Story : क्रिकेटसाठी घर सोडले, पोटासाठी पाणीपुरी विकली अन् 'यशस्वी' झाला

Yashasvi Jaiswal Success Story : वानखेडे मैदानावर शतकी खेळी करणाऱ्या यशस्वी जयस्वाल याची सध्या चर्चा सुरु आहे.

Yashasvi Jaiswal Success Story : वानखेडे मैदानावर शतकी खेळी करणाऱ्या यशस्वी जयस्वाल याची सध्या चर्चा सुरु आहे. पण यशस्वीला हे यश मिळवण्यासाठी संघर्षाची पराकाष्ठा करावी लागली. क्रिकेटच्या वेडापायी लहानपणी यशस्वीने घर सोडले होते. मुंबईत यशस्वीला राहण्यासाठी घरही नव्हते.. तो आझाद मैदानावर झोपलाय... कधी पाणीपुरी विकली.. आज तो ज्या शिखरावर पोहचलाय त्या यशामध्ये त्याचा मोठा संघर्ष आहे. पाहूयात यशस्वीची संघर्षगाथा..... 

यशस्वी जयस्वाल हा मूळचा उत्तर प्रदेशच्या भदोही खेड्यातील एका छोट्याशा दुकानदाराचा मुलगा आहे. क्रिकेटच्या वेडापायी त्यानं वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी मुंबई गाठली.  त्यानंतर अनेक दिव्य पार करत आज तो यशाच्या एका अत्युच्य शिखरावर जाऊन पोहोचला आहे. त्यावेळी स्वप्ननगरी मुंबईत यशस्वीच्या मुक्कामाचीही अडचण होती. मग त्यानं मुंबईतलं आझाद मैदान हेच आपलं घर बनवलं. खरं तर मोकळं आकाश हेच त्याच्या घराचं छत होतं. पण हळूहळू ओळखी वाढवून तो आझाद मैदानावरच्या मुस्लीम युनायटेडच्या तंबूत झोपू लागला. त्या काळात यशस्वीनं पोटापाण्यासाठी आझाद मैदानावर पाणीपुरीही विकली. क्रिकेट खेळायला मिळावं या एकमेव हेतूनं त्यानं कुठलंही काम हलकं मानलं नाही. पाणीपुरी विकतानाचे त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अंडर 19 विश्वचषकात यशस्वी जयस्वाल याने आपल्या दमदार फलंदाजीचे प्रदर्शन करत जगभरातील क्रीडाप्रेमींचं लक्ष वेधले होते. 

यशस्वी जयस्वालच्या संघर्षात प्रशिक्षक ज्वाला सिंह यांची मिळालेली साथ मोलाची आहे. त्यांनी यशस्वीमधील गुणवत्तेला न्याय मिळवून दिलाच पण त्याच्या डोक्यावर छप्पर येईल असा हक्काचा आसराही मिळवून दिला. ज्वाला सिंह यांनी दिलेल्या पाठिंब्यानं यशस्वीचा आत्मविश्वास बळावला. मग त्यानं मुंबईत वयोगटाचं क्रिकेट गाजवायला सुरुवात केली. मुंबईतल्या आंतरशालेय क्रिकेटमध्ये यशस्वीनं आधी रिझवी हायस्कूलचं नाव मोठं केलं. मग मुंबई क्रिकेटच्या वयोगट क्रिकेटची एकेक पायरी त्यानं झपाझप पार केली. त्यानंतर टीम इंडियाच्या अंडर 19 संघातही स्थान पटकावले. मुंबईकडून रणजी सामन्यातही तो खेळलाय. अंडर 19 विश्वचषकात पाकिस्तानविरोधात झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात यशस्वी जयस्वाल याने शतकी खेळी केली होती. यशस्वी याला त्यानंतर राजस्थान संघाने आपल्या ताफ्यात घेतले. त्यासाठी तीन कोटींपेक्षा जास्त रक्कम मोजली होती. जिद्द, चिकाटी, मेहनत आणि संयम याच्या जोरावर आज यशस्वी एक एक शिखर सर करतोय. भविष्यात तो भारतीय संघाचा सदस्य होईल, यात काही शंकाच नाही. 

यशस्वी जयस्वाल याने यंदाच्या हंगामात आतापर्यंत सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा, फाफ डु प्लेसिस, जोस बटलर यासारखे दिग्गज फलंदाजांच्या शर्यतीत यशस्वी सर्वात पुढे आहे. यशस्वी जयस्वाल याने नऊ सामन्यात 48 च्या सरासरीने आणि 160 च्या स्ट्राईक रेटने 428 धावा चोपल्या आहेत. यामध्ये त्याने तीन अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. 

(आणखी वाचा : IPL 2023 : कधीकाळी मुंबईत पाणीपुरी विकली, आता आयपीएलमध्ये झळकावले शतक )

आयपीएलमधील कामगिरी कशी राहिली ?
यशस्वी जयस्वाल याने 2020 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. पदार्पणात यशस्वीला प्रभावी कामगिरी करता आली नाही. तीन सामन्यात त्याला फक्त 34 धावा काढता आल्या. त्यानंतर प्रत्येक हंगामानंतर यशस्वीची कामगिरी सुधारत गेली.  आतापर्यंत यशस्वीने आयपीएलमध्ये 32 सामने खेळले आहेत. यशस्वीने 32 सामन्यात 145 च्या स्ट्राईक रेटने  975 धावा केल्या आहेत.  यामध्ये सहा अर्धशतके आणि एका शतकाचा समावेश आहे.  यशस्वीने आतापर्यंत 40 षटकार आणि 118 चौकार लगावले आहेत. 

देशांतर्गत क्रिकेटमध्ये कशी आहे कामगिरी - 

यशस्वी जयस्वाल मुंबई संघाकडून तसेच टीम इंडिया ब संघाचा सदस्य आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये यशस्वीने 15 सामन्यातील 26 डावात 80 च्या सरासरीने 1845 धावा केल्या आहेत. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये 32 डावात 1511 धावा केल्या आहेत. त्याशइवाय सात विकेटही घेतल्या आहेत. यशस्वीच्या नावावर 14 शतके आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tirupati Laddu controversy : कमीत कमी देवाला तरी राजकारणापासून लांब ठेवा! तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादावर कोर्टाची सर्वोच्च 'चपराक'!
कमीत कमी देवाला तरी राजकारणापासून लांब ठेवा! तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादावर कोर्टाची सर्वोच्च 'चपराक'!
आरक्षण संपवण्याच्या हालचाली, पडद्यामागे भाजप-ठाकरे गटाच्या गुप्त वाटाघाटी; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
आरक्षण संपवण्याच्या हालचाली, पडद्यामागे भाजप-ठाकरे गटाच्या गुप्त वाटाघाटी; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
गूडन्यूज! मुंबईत दाबलं बटन, गावाकडं आले पैसे; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 10 हजार अनुदान जमा
गूडन्यूज! मुंबईत दाबलं बटन, गावाकडं आले पैसे; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 10 हजार अनुदान जमा
पुणे जिल्ह्यात बसचा भीषण अपघात, ST थेट शेतात; 42 जखमी तीन गंभीर
पुणे जिल्ह्यात बसचा भीषण अपघात, ST थेट शेतात; 42 जखमी तीन गंभीर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kiren Rijiju : दलित मतांसाठी भाजपकडून किरण रिजीजू मैदानातShyam Manav on Devendra Fadnavis : श्याम मानव यांचे फडणवीस आणि सरकारवर गंभार आरोपTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 30 सप्टेंबर 2024 : ABP MajhaVishwa Hindu Parishad : शेख सुभान अली यांच्या वक्तव्यामुळे शिवभक्तांचा अपमान - विश्व हिंदू परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tirupati Laddu controversy : कमीत कमी देवाला तरी राजकारणापासून लांब ठेवा! तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादावर कोर्टाची सर्वोच्च 'चपराक'!
कमीत कमी देवाला तरी राजकारणापासून लांब ठेवा! तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादावर कोर्टाची सर्वोच्च 'चपराक'!
आरक्षण संपवण्याच्या हालचाली, पडद्यामागे भाजप-ठाकरे गटाच्या गुप्त वाटाघाटी; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
आरक्षण संपवण्याच्या हालचाली, पडद्यामागे भाजप-ठाकरे गटाच्या गुप्त वाटाघाटी; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
गूडन्यूज! मुंबईत दाबलं बटन, गावाकडं आले पैसे; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 10 हजार अनुदान जमा
गूडन्यूज! मुंबईत दाबलं बटन, गावाकडं आले पैसे; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 10 हजार अनुदान जमा
पुणे जिल्ह्यात बसचा भीषण अपघात, ST थेट शेतात; 42 जखमी तीन गंभीर
पुणे जिल्ह्यात बसचा भीषण अपघात, ST थेट शेतात; 42 जखमी तीन गंभीर
Sayyed Hassan Nasrallah Assassination : इस्त्रायलच्या हल्ल्यात 'हिजबुल्लाह'चा नसराल्लाह मारला गेला, मृतदेह सापडला, पण शरीरावर एकही जखम नाही! मग कशाने मृत्यू ओढवला?
इस्त्रायलच्या हल्ल्यात 'हिजबुल्लाह'चा नसराल्लाह मारला गेला, मृतदेह सापडला, पण शरीरावर एकही जखम नाही! मग कशाने मृत्यू ओढवला?
Maharashtra School uniform quality: एकनाथ शिंदेंनी सभागृहात केलेल्या चेष्टेचा हिशेब रोहित पवारांनी चुकता केला, शालेय गणवेशाच्या क्वालिटीचा मुद्दा तापला
एकनाथ शिंदेंनी सभागृहात केलेल्या चेष्टेचा हिशेब रोहित पवारांनी चुकता केला, शालेय गणवेशाच्या क्वालिटीचा मुद्दा तापला
मुस्लीम मावळ्यांनी शिवरायांच्या स्वराज्याचा भगवा समुद्रात फडकावला, सुभान अलींच्या वक्तव्यानंतर मनसे आक्रमक
मुस्लीम मावळ्यांनी शिवरायांच्या स्वराज्याचा भगवा समुद्रात फडकावला, सुभान अलींच्या वक्तव्यानंतर मनसे आक्रमक
कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकीटांचा काळाबाजार, सरकारने कारवाईचा बडगा उगारतचा सीईओ गुपचूप सागर बंगल्यावर पोहोचले पण...
कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकीटांचा काळाबाजार, सरकारने कारवाईचा बडगा उगारतचा सीईओ गुपचूप सागर बंगल्यावर पोहोचले पण...
Embed widget