Chris Gayle : युनिवर्स बॉस परत येतोय, ख्रिस गेल आयपीएलमध्ये खेळण्यासाठी सज्ज
IPL Chris Gayle : युनिवर्स बॉस म्हणजेच ख्रिस गेल यंदा आयपीएलमध्ये खेळताना दिसला नाही. गेलने मेगा लिलावात आपले नाव दिले नव्हते. पण आता ख्रिस गेलने स्वत: आयपीएलमधील पुनरागमनाबाबत वक्तव्य केलेय.
IPL Chris Gayle : युनिवर्स बॉस म्हणजेच ख्रिस गेल यंदा आयपीएलमध्ये खेळताना दिसला नाही. गेलने मेगा लिलावात आपले नाव दिले नव्हते. पण आता ख्रिस गेलने स्वत: आयपीएलमधील पुनरागमनाबाबत वक्तव्य केलेय. आयपीएलमध्ये खेळण्यासाठी मी परत येतोय.. असे वक्तव्य ख्रिस गेलने एका मुलाखतीत केलेय. (Chris Gayle On IPL Comeback)
आयपीएलमध्ये मी आतापर्यंत कोलकाता, आरसीबी आणि पंजाब संघाचे प्रतिनिधित्व केलेय. मी आयपीएलमध्ये परत येईल. आरसीबी आणि पंजाब यापैकी एका संघाला आयपीएल स्पर्धा जिंकून द्यायला मला आवडेल. आरसीबीमध्ये माझा चांगला काळ होता. तिथे मी धावांचा पाऊस पाडला होता. आरसीबीमध्ये असताना सर्वात यशस्वी झालो होते. तर पंजाबसोबत खेळतानाचाही काळ चांगला होता. मला आव्हानाला सामोरं जायले आवडते. पाहूयात पुढे काय होतेय. पुढील वर्षी मी परत येतोय, त्यांना माझी गरज आहे, असे गेल म्हणाला.
योग्य वागणूक मिळाली नाही -
आयपीएलमध्ये मला जो सन्मान मिळायला हवा तो मिळाला नाही. तसेच मला योग्य वागणूकही मिळाली नाही, असे खळबळजनक वक्तव्य युनिवर्स बॉस ख्रिस गेल याने केलेय. गेलला मागील काही हंगामात प्लेइंग इलेव्हनमध्ये सतत संधी मिळत नव्हती. तसेच, बायो-बबल आणि थकव्यामुळे आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यादरम्यान माघार घेतली होती. त्यानंतर 2022 मध्ये त्याने लिलावातही आपले नाव दिले नव्हते.
युनिवर्स बॉसची कामगिरी -
टी 20 क्रिकेट युनिवर्स बॉसशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. आयपीएल असो वा आणखी कोणताही स्पर्धा..त्यामध्ये ख्रिस गेलची कामगिरी नेहमीच वादळी राहिली आहे. टी 20 क्रिकेटमध्ये गेलच्या नावावर अनेक विक्रम आहेत. गेलने कोलकाता, आरसीबी आणि पंजाब संघाकडून आयपीएलचे सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम गेलच्या नावावर आहे. तसेच 30 चेंडूत शतक झळकावण्याचा विक्रमही त्याच्यच नावावर आहे. आरसीबीकडून केळताना गेलने अवघ्या 66 चेंडूत 175 धावांचा पाऊस पाडला होता. पण गेलने यंदाच्या आयपीएलमधून आपले नाव काढले होते.