एक्स्प्लोर

IPL 2023 : साल्टने केली RCB च्या गोलंदाजांची कत्तल, दिल्लीचा सात विकेटने विजय

DC vs RCB, IPL 2023 : फिल साल्टच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर दिल्लीने आरसीबीचा सात विकेटने पराभव केला.

DC vs RCB, IPL 2023 : फिल साल्टच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर दिल्लीने आरसीबीचा सात विकेटने पराभव केला. आरसीबीने दिलेले 182 धावांचे आव्हान दिल्लीने सात विकेट आणि 20  चेंडू राखून सहज पार केले. या विजयासह दिल्लीने प्लेऑफमधील आपले आव्हान जिवंत ठेवलेय. दिल्लीचा दहाव्या सामन्यातील हा चौथा विजय आहे. स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दिल्लीला उर्वरित सर्व सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य आहे. दुसरीकडे आरसीबीचे प्लेऑफमधील आव्हान अधीक खडतर झालेय. प्लेऑफमध्ये पोहचण्याचे चान्स आरसीबीचे फक्त ३४ टक्के इतकेच आहेत. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी आरसीबीला उर्वरित सामन्यात विजय मिळवावा लागेल. 

आरसीबीने दिलेल्या 182 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने वादळी सुरुवात केली. खासकरुन फिल साल्ट याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. फिल साल्ट याने आरसीबीच्या गोलंदाजांची कत्तल केली. साल्ट याने आऱसीबीच्या प्रत्येक गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. साल्ट याने ४५ चेंडूत ८७ धावांची वादळी खेळी केली. या खेळीत साल्टने सहा षटकार आणि आठ चौकार लगावले. रायली रुसो याने २२ चेंडूत ३५ धावांचे योगदान दिले. तर मिचेल मार्श याने २६ आणि वॉर्नरने २२ धावांचे योगदान दिले. 

साल्ट आणि वॉर्नर यांनी पाच षटकात ६० धावांची सलामी दिली. वॉर्नरने एक षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने २२ धावांची खेळी केली. मिचेल मार्श याने एक षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने २६ धावांचे योगदान दिले. फिल साल्ट बाद झाल्यानंतर रुसोने दिल्लीला सहज विजय मिळवून दिला. रुसोने तीन षटकार आणि एक चौकार लगावत नाबाद ३५ धावांची खेळी केली. अक्षर पटेल याने एका षटकारासह आठ धावांची खेळी केली. 

आरसीबीच्या एकाही गोलंदाजाला प्रभावी मारा करता आला नाही. दिल्लीच्या फलंदाजांनी प्रत्येक गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. साल्ट याचा १७ धावांवर दिनेश कार्तिक याने झेल सोडला.. त्यानंतर साल्ट याने आक्रमक फलंदाजी करत ८७ धावांची खेळी केली.  कर्ण शर्मा, हेजलवूड आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. 

विराटचा संयम अन् महिपालचे वादळ; आरसीबीची 181 धावांपर्यंत मजल
DC vs RCB, IPL 2023 : विराट कोहली आणि महिपाल लोमरोर यांच्या अर्धशतकाच्या बळावर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 181 धावांपर्यंत मजल मारली. दिल्लीकडून मिचेल मार्श याने दोन विकेट घेतल्या. महिपाल लोमरोर याने नाबाद ५४ धावांची खेळी केली. 

विराट कोहलीचे अर्धशतक

रनमशीन विराट कोहली याने आज पुन्हा एकदा अर्धशतक झळकावले. विराट कोहलीने पहिल्यापासूनच संयमी फलंदाजी करत आऱसीबीची धावसंख्या वाढवली. विराट कोहलीने आयपीएलमध्ये अर्धशतकाचे अर्धशतक झळकावले. त्याशिवाय आयपीएमध्ये सात हजार धावा करण्याचा विक्रमही विराट कोहलीने केला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहलीने आज पुन्हा एकदा अर्धशतक झळकावत आरसीबीच्या डावाला आकार दिला. विराट कोहलीने यंदाच्या आयपीएलमध्ये सहावे अर्धशतक झळकावले. विराट कोहलीने ४६ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. या खेळीत विराट कोहलीने पाच चौकार लगावले. विराट कोहलीने पहिल्या विकेटसाठी कर्णधार फाफ डु प्लेसिससोबत ८२ धावांची भागिदारी केली. तर तिसऱ्या विकेटसाठी महिपाल लोमरोर याच्यासोबत अर्धशतकी भागिदारी केली. 

महिपाल लोमरोरचे अर्धशतक -

मॅक्सवेल आणि फाफ बाद झाल्यानंतर महिपाल लोमरोर याने विराट कोहलीची चांगली साथ दिली. विराट कोहली बाद झाल्यानंतर महिपाल लोमरोर याने सर्व सुत्रे आपल्या हातात घेतली. महिपाल लोमरोर याने कार्तिकसोबत आरसीबीच्या डावाला आकार दिला. लोमरोर याने अवघ्या २७ चेंडूत अर्धशतक झळकावले. महिपाल लोमरोर याचे आयपीएलमधील हे पहिले अर्धशतक होय.. तीन षटकार आणि सहा चौकारांच्या मदतीने महिपाल याने अर्धशतक झळकावले. 

फाफची निर्णायाक खेळी - 

विराट कोहली आणि फाफ यांनी पहिल्या दोन षटकात सयंमी फलंदाजी केली. त्यानंतर फाफ डु प्लेसिस याने आक्रमक रुप धारण केले. विराट कोहलीने एक बाजू लावून धरली होती.. दुसऱ्या बाजूला फाफने आक्रमक फलंदाजी करत आरसीबीची धावसंख्या वाढवली. फाफ डु प्लेलिस याने ३२ चेंडूत ४५ धावांची खेळी केली. यामध्ये फाफने एक षटकार आणि पाच चौकार लगावले. मिचेल मार्श याने फाफ डु प्लेसिस याची आक्रमक खेळी संपुष्टात आणली. मॅक्सेवल याला आज खातेही उघडता आले नाही. दिनेश कार्तिक याने नऊ चेंडूत ११ धावांचे योगदान दिले. यामध्ये एका षटकाराचा समावेश होय. अनुज रावत याने अखेरीस तीन चेंडूत नाबाद आठ धावांची खेळी केली.

दिल्लीची गोलंदाजी कशी राहिली?

दिल्लीकडून मिचेल मार्श याने सर्वाधिक विकेट घेतल्या. मिचेल मार्स याने तीन षटकात २१ धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. खलील अहमद आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. मकेश कुमार आणि खलील अहमद यांनी प्रति षटक दहा पेक्षा जास्त धावा दिल्या. कुलदीप यादवही महागडा ठरला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 :  टॉप 25 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : 13 December 2024 : 7.30 PM ABP MajhaAjinkya Rahane : 16 चेंडूत ठोकल्या 74 धावा! 'अजिंक्य' वादळाचा तडाखाABP Majha Headlines : 07 PM : 13 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Ration Supply : ठप्प रेशन, लोकांना टेन्शन; राज्यात आणखी दोन दिवस धान्य पुरवठा रखडणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं ठिकाण बदललं; आता नागपुरात शपथविधी, वेळही ठरली
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं ठिकाण बदललं; आता नागपुरात शपथविधी, वेळही ठरली
कहरच... ZP शाळेच्या मैदानावर बॉम्बे डान्स, बिभत्स नृत्याविष्कार; कारवाईची मागणी
कहरच... ZP शाळेच्या मैदानावर बॉम्बे डान्स, बिभत्स नृत्याविष्कार; कारवाईची मागणी
Embed widget