IPL 2022 : आंबा कसा खायचा? पृथ्वी शॉला दिल्लीच्या खेळाडूंनी शिकवले, पाहा मजेदार व्हिडिओ
IPL 2022, Delhi Capital : दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने खेळाडूंचा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
IPL 2022, Delhi Capital : दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने खेळाडूंचा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. प्रॅक्टिस सेशनदरम्यान खेळाडू आंबे खात असतानाचा हा व्हिडिओ दिल्लीने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मुंबईच्या पृथ्वी शॉला आंबा खाण्याचा सल्ला दिल्लीतील खेळाडूंनी दिला आहे. पृथ्वीला आंबा कसा खायचा असा प्रश्न पडला होता. त्यानंतर ललीत यादवसह इतर खेळाडूंनी पृथ्वीला आंबा कसा खायचा सांगितले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पॅक्टिसमधील ब्रेकमध्ये दिल्लीचे खेळाडू आंबे खाण्याचा आस्वाद घेत आहेत. यावेळी तिथे असणाऱ्या पृथ्वीला आंबा खायचा कसा असा प्रश्न पडला. त्यानंतर ललीत यादवसह इतर खेळाडू पृथ्वीला आंबा कसा खायचा ते समजावून सांगतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडिओ.....
🎥 | The DC Camp teaching @PrithviShaw how to eat a mango without cutting is all the content you need today 🥭😂
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 15, 2022
How was the experience, Shaw-stopper❓😋#YehHaiNayiDilli | #IPL2022 | #OctaRoarsForDC#TATAIPL | #IPL | #DelhiCapitals | #DCAllAccess pic.twitter.com/2I76uJiB12
दिल्लीचा पुढील सामना शनिवारी -
ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्लीचा पुढील सामना शनिवारी होणार आहे. दिल्लीने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. यापैकी दिल्लीला दोन सामन्यात विजय मिळवता आलाय. तर दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुणतालिकेत दिल्ली सातव्या क्रमांकावर आहे. दिल्लीचा पुढील सामना शनिवारी होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमर दिल्ली आरसीबी संघासोबत दोन हात करणार आहे.
हे देखील वाचा-
- Hardik Pandya: हार्दिक पांड्याच्या दुखापतीबाबत महत्वाची अपडेट्स, गुजरातचे चाहते चिंतेत
- Who Is Yash Dayal: पदार्पणाच्या सामन्यात गाजवलं मैदान! कोण आहे यश दयाल? ज्याच्यासमोर राजस्थानच्या फलंदाजांनी टेकले गुडघे
- Joe Root Steps Down: इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का! कर्णधार जो रूटनं घेतला सर्वात मोठा निर्णय