डेविड वॉर्नरचा मोठा विक्रम, विराट कोहलीनंतर असा करणारा दुसरा खेळाडू
IPL 2023 : दिल्लीची कामगिरी निराशाजनक राहिली पण कर्णधार डेविड वॉर्नर याने धावांचा पाऊस पाडला.
IPL 2023,David Warner : आयपीएलच्या सोळाव्या हंगमात दिल्लीची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. दिल्लीला सलग पाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी कोलकात्याचा पराभव करत आपल्या विजयाचे खाते उघडले. दिल्लीची कामगिरी निराशाजनक राहिली पण कर्णधार डेविड वॉर्नर याने धावांचा पाऊस पाडला. वॉर्नर याने सहा सामन्यात चार अर्धशतके झळकावली आहेत. कोलकात्याविरोधातही वॉर्नरने अर्धशतकी खेळी केली. त्यासह त्याने खास विक्रम केला आहे. धावांचा पाठलाग करताना तीन हजार धावांचा पल्ला पार केला आहे. अस पराक्रमक करणारा वॉर्नर आयपीएलच्या इतिहासातील दुसरा फलंदाज ठरलाय. याआधी फक्त विराट कोहलीने हा पराक्रम केला आहे.
धावांचा पाठलाग करताना आरसीबीच्या विराट कोहलीने ३१७९ धावा केल्या आहेत. तर डेविड वॉर्नर याने काल तीन हजार धावांचा पल्ला पार केला. धावांचा पाठलाग करताना वॉर्नरच्या नावावर ३०३६ धावांची नोंद आहे. या दोन खेळाडूंशिवाय अद्याप एकाही फलंदाजाला धावांचा पाठलाग करताना तीन हजारांचा पल्ला पार करता आला नाही. वॉर्नरनंतर तिसऱ्या क्रमांकार रॉबिन उथप्पा याचा क्रमांक लागतो.. उथप्पाने २८३२ धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर पंजाबचा कर्णधार शिखऱ धवन आहे..धवन याने धावांचा पाठलाग करताना 2707 धावा केल्या आहेत. त्यानंतर पाचव्या स्थानावर रोहित शर्माचा क्रमांक लागतो. रोहित शर्माने धावांचा पाठलाग करताना 2549 धावा चोपल्या आहेत.
David Warner became 2nd player to Score 3000 IPL runs while chasing
— Broken Cricket (@BrokenCricket) April 20, 2023
3179 - Virat Kohli
3036 - David Warner*
2832 - Robin Uthappa
2707 - Shikhar Dhawan
2549 - Rohit Sharma
Most runs against single opponent in IPL वॉर्नरने मोडला रोहित शर्माचा हा विक्रम -
कोलकाताविरोधात डेविड वॉर्नर आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. आयपीएलच्या इतिहासात एखाद्या संघाविरोधात स्वाधिक धावा चोपणाऱ्या फलंदाजात वॉर्नर पहिल्या क्रमांकावर पोहचलाय. वॉर्नरने कोलकाताविरोधात आतापर्यंत २७ सामन्यात ४४ च्या सरासरीने १०७५ धावांचा पाऊस पाडलाय. याआधी हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता. रोहित शर्माने कोलकात्याविरोधात ३२ सामन्यात १०४० धावांचा पाऊस पाडला होता. एका संघाविरोधात सर्वाधिक धावा चोपण्याचा विक्रमात विराट कोहली आणि शिखऱ धवन यांच्या नावाचाही समावेश आहे. पाहा संपूर्ण यादी..
-1075 – डेविड वॉर्नर vs केकेआर
-1040 – रोहित शर्मा vs केकेआर
-1029 – शिखर धवन vs सीएसके
-1005 – डेविड वॉर्नर vs पीबीकेएस
-985 – विराट कोहली vs सीएसके