CSK vs SRH Dream11 Prediction: शिवम दुबे, ट्रॅव्हिस हेड, हेनरिक क्लासेन...; पाहा 11 खेळाडूंची टीम, आज तुम्हाला करेल मालामाल
CSK vs SRH Latest News Marathi: चेन्नई आणि हैदराबादमधील आजचा सामना खूपच मनोरंजक असू शकतो.
Dream11 Prediction CSK vs SRH Latest News Marathi: चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात आज सामना होणार आहे. हैदराबादमधील राजीव गांधी मैदानावर हा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता हा सामना सुरु होईल.
चेन्नई आणि हैदराबादमधील आजचा सामना खूपच मनोरंजक असू शकतो. कारण एकीकडे एमएस धोनीचे चाहते असतील तर दुसरीकडे आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या उभारणारे हैदराबादचे खेळाडू आमनेसामने असतील. चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आज बदल होण्याची शक्यता आहे. तर हैदराबादचा संघ कोणताही बदल न करता मैदानात उतरू शकतो.
चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. हे खेळाडू तुम्हाला पैसे कमवून देऊ शकतात. चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघातून शानदार कामगिरी करु शकणाऱ्या 11 खेळाडूंची आम्ही निवड केली आहे. हे खेळाडू आज तुम्हाला मालामाल करु शकतात.
CSK vs SRH Dream11 Match Top Picks:
कर्णधार: रचिन रवींद्र
उपकर्णधार: ट्रॅव्हिस हेड
यष्टिरक्षक: हेनरिक क्लासेन
फलंदाज: रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड, शिवम दुबे, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा
अष्टपैलू: डॅरिल मिशेल, एडन मार्कराम
गोलंदाज: पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार, मथिशा पथीराना
खेळपट्टी कशी असेल?
हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये गेल्या काही काळापासून फलंदाजांच्या मदतीची खेळपट्टी पाहायला मिळत आहेत. अशा स्थितीत चेन्नई आणि हैदराबाद यांच्यातील उच्च धावसंख्यांचा सामना पाहायला मिळेल. या मैदानावर मुंबईविरुद्ध खेळताना हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या 277 धावांची केली होती. प्रत्युत्तरात मुंबई संघाने 20 षटकांत 246/5 अशी मजल मारली. आता चेन्नई आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यातही फलंदाजीची खेळपट्टी पाहायला मिळेल.
चेन्नई सुपर किंग्सचा संपूर्ण संघ:
रुतुराज गायकवाड (C), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (W), दीपक चहर, तुषार देशपांडे, मथीशा पाथीराना, मुस्तफिजुर रहमान, शार्दुल रहमान, मुस्तफिजुर रहमान शेख रशीद, मोईन अली, मिचेल सँटनर, डेव्हॉन कॉनवे, अजय जाधव मंडल, प्रशांत सोळंकी, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंग, आरएस हंगरगेकर, महेश थेक्षाना, निशांत सिंधू, अरावेली अवनीश
सनरायझर्स हैदराबादचा संपूर्ण संघ
मयंक अग्रवाल, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (W), शाहबाज अहमद, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर, पॅट कमिन्स (C), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, नितीश रेड्डी, उपेंद्र यादव, राहुल त्रिपाठी, टी नटराजन, अनमोलप्रीत सिंग, झटावेध सुब्रमण्यन, सनवीर सिंग, फजलहक फारुकी, मार्को जानसेन, आकाश महाराज सिंग
संबंधित बातम्या:
गुजरातविरुद्ध स्फोटक खेळी, सामनावीर पुरस्कारही मिळवला; पण शशांक सिंग हे काय बोलून गेला?
11 चेंडूत अर्धशतक, युवराज सिंगचा 16 वर्षांचा मोडलाय विक्रम; कोण आहे आशुतोष शर्मा?