(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CSK vs LSG : स्टोइनिसचं शतक ऋतुराजवर भारी, लखनौचा 6 विकेट्सने विजय
IPL 2024 : स्टोइनिसचं शतक ऋतुराज गायकवाडवर भारी पडलं आणि लखनौने 6 विकेट्सने चेन्नई विरुद्धचा सामना जिंकला.
LSG vs CSK : लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) पराभव केला. लखनौने चेन्नईवर विरुद्धचा (CSK vs LSG) सामना सहा विकेट्सने जिंकला. स्टोइनिसचं शतक ऋतुराज गायकवाडवर भारी पडलं आणि लखनौने 6 विकेट्सने चेन्नई विरुद्धचा सामना खिशात घातला. स्टोइनिसने दमदार शतकी खेळीच्या जोरावर संघाला विजय मिळवून दिला.
स्टोइनिसने शतकी खेळी ऋतुराजवर भारी
नाणेफेक जिंकून लखनौने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजी करताना 210 धावांचं आव्हान लखनौ संघापुढे ठेवलं. चेन्नईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौकडून स्टोइनिसने शतकी खेळी केली. स्टोइनिसने चेंडूत 63 चेंडून 124 धावांची नाबाद खेळी केली. यामध्ये 13 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश आहे.
स्टोइनिसने एकाकी झुंज
याशिवाय निकोलस पुरनने 34 धावांची खेळी केली. इतर सर्व फलंदाज स्वस्तात तंबूत परतले. पहिल्याच षटकात क्विंटन डी कॉकची विकेट गेली, त्यामुळे लखनौची सुरुवात डगमगली होती. मात्र, नंतर स्टोइनिसने एकाकी झुंज देत संघाला विजय मिळवून दिला.
TAKE. A. BOW Marcus Stoinis 🔥🔥
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2024
Magnificent knock under pressure and he gets his side over the line 🥳
Recap the match LIVE on @StarSportsIndia and @JioCinema 💻📱#TATAIPL | #CSKvLSG | @LucknowIPL pic.twitter.com/3rlRLvftDO
ऋतुराज गायकवाडची शतकी खेळी व्यर्थ
लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपरजायंट्सने पहिल्यांदा खेळताना 210 धावा केल्या. चेन्नईकडून सर्वाधिक धावा कर्णधार ऋतुराज गायकवाडने केल्या. ऋतुराजने 56 चेंडूत झंझावाती शतक झळकावलं. त्याने या सामन्यात 60 चेंडूत 108 धावा केल्या, यामध्ये 12 चौकार आणि तीन षटकार लगावले. ऋतुराजला शिवम दुबेने साथ दिली. ऋतुराजने शिवम दुबेसोबत केलेल्या 104 धावांच्या भागीदारीमुळे चेन्नई सुपर किंग्जला 210 धावांपर्यंत मजल मारता आली.
चेन्नईची सुरुवात निराशाजनक
चेन्नई संघ पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरला मात्र, त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. चेन्नईच्या पहिल्या दोन विकेट लवकर गेल्या. अजिंक्य रहाणे एक धावा करून बाद झाला. त्यानंतर डॅरिल मिशेलही फक्त 11 धावा करून तंबूत परतला. 50 धावांत संघाचे 2 विकेट पडल्या होत्या. पण त्यानंतर ऋतुराज गायकवाडने एक बाजू भक्कमपणे धरून ठेवली आणि त्यानंतर त्याला शिवम दुबेने साथ दिली. या दोघांनी लखनौच्या गोलंदाजांना घाम फोडला होता. रवींद्र जडेजानेही 19 चेंडूत 16 धावांचं योगदान दिलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :