एक्स्प्लोर

CSK vs KKR IPL 2024: केकेआरविरुद्धच्या सामन्याआधी MS धोनीची तुफान फटकेबाजी; सुरेश रैनाही दिसला सोबत, Video

CSK vs KKR IPL 2024: केकेआरविरुद्धच्या सामन्याआधी चेन्नईचा माजी कर्णधार एमएस धोनीने सरावात तुफान फटकेबाजी केली.

CSK vs KKR IPL 2024: आज चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (kolkata knight riders) यांच्यात सामना होणार आहे. चेन्नईमधील एमए चिदंबरम मैदानावर हा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता हा सामना सुरु होईल.

केकेआरविरुद्धच्या सामन्याआधी चेन्नईचा माजी कर्णधार एमएस धोनीने सरावात तुफान फटकेबाजी केली. यावेळी चेन्नईचा माजी खेळाडू सुरेश रैना देखील उपस्थित होता. नेट्समध्ये फलंदाजी करताना सुरेश रैना धोनीच्या मागे उभा राहून फलंदाजीचा आनंद घेताना दिसला. यादरम्यानचा व्हिडीओ आयपीएलने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

धोनी तयार होऊन सरावासाठी नेटवर जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी सुरेश रैनाही धोनीला नेटमध्ये पाहताना दिसला. मग धोनीने सराव सुरू करताच तो षटकार मारण्यास सुरुवात करतो. धोनी षटकार वगळता दुसरा कोणताही शॉट खेळत नाही. तो चारही दिशांनी एकामागून एक षटकार मारतो. धोनीने षटकार मारण्यासाठी मैदानाचा एकही कोपरा सोडला नाही, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

धोनीने आतापर्यंत केलीय दोनदा फलंदाजी-

धोनी आयपीएल 2024 मध्ये दोनदा फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात तो पहिल्यांदा फलंदाजीला आला होता. दिल्लीविरुद्ध, धोनीने 16 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 37* धावांची खेळी खेळली. यानंतर सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात  धोनी फलंदाजीसाठी आला, जिथे त्याने केवळ 2 चेंडूंचा सामना केला आणि नाबाद राहताना 1 धाव काढली. धोनीची फलंदाजी पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात आणि जेव्हाही तो फलंदाजीला येतो तेव्हा स्टेडियममध्ये वेगळेच वातावरण असते.

गुणतालिकेत टॉपवर कोण?

आतापर्यंत संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने आपले चारही सामने जिंकले आहेत, त्यामुळे हा संघ 8 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. याशिवाय कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचे सलग तीनही सामने जिंकले, त्यामुळे श्रेयस अय्यरच्या संघाचे 6 गुण झाले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स प्लेऑफच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. मात्र, अद्याप निम्मे सामनेही झाले नसल्यामुळे सध्याच्या गुणतालिकेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, चौथ्या क्रमांकावरील चेन्नई सुपर किंग्ज आणि सातव्या क्रमांकावर असलेल्या गुजरात टायटन्सचे प्रत्येकी 4 गुण आहेत. अशा स्थितीत केवळ एका सामन्यानंतर मोठा बदल पाहायला मिळू शकतो.

संबंधित बातम्या-

आज चेन्नई अन् कोलकाताचा सामना; मात्र त्याआधी गौतम गंभीरच्या विधानाची रंगली चर्चा, धोनीबाबत काय म्हणाला?

IPL 2024: आयपीएलच्या केवळ 21 सामन्यांमध्ये स्पष्ट झाले; हे 2 संघ प्लेऑफमध्ये नक्की पोहचणार!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhansabha Superfast | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 21 Nov 24Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..Jitendra Awhad Full PC : प्रतिभा पवारांची गेटवर अडवणूक प्रकरण, जितेंद्र आव्हाड अजितदादांवर कडाडलेSantosh Bangar on Vidhan Sabha : 25 हजारांच्या फरकाने सीट निघेल, मतदानानंतर संतोष बांगर निवांत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
Embed widget