एक्स्प्लोर

CSK vs KKR: आज चेन्नई अन् कोलकाताचा सामना; मात्र त्याआधी गौतम गंभीरच्या विधानाची रंगली चर्चा, धोनीबाबत काय म्हणाला?

CSK vs KKR IPL 2024: चेन्नई आणि कोलकाताच्या सामन्याआधी केकआर संघाचा मेंटॉर गौतम गंभीरच्या विधानाची चर्चा रंगली आहे.

CSK vs KKR IPL 2024: आज चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (kolkata knight riders) यांच्यात सामना होणार आहे. चेन्नईमधील एमए चिदंबरम मैदानावर हा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता हा सामना सुरु होईल.

चेन्नई आणि कोलकाताच्या सामन्याआधी केकआर संघाचा मेंटॉर गौतम गंभीरच्या विधानाची चर्चा रंगली आहे. आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असलेल्या गंभीरने आयपीएलदरम्यान सीएसकेचा माजी कर्णधार एमएस धोनीबद्दल एक विधान केलं आहे. 

गौतम गंभीर स्टार स्पोर्ट्सवरील एका कार्यक्रमात बोलताना म्हणाला की, एमएस धोनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. तसेच धोनी ज्या पातळीवर पोहचला आहे, तिथपर्यंत पोहचणं खूप कठीण असल्याचं देखील गंभीरने सांगितले. तीन आयसीसी ट्रॉफी जिंकणे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा मोठे आहे, असं गंभीर यावेळी म्हणाला. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली आयसीसी टी-20 विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर 2011 साली वन-डे विश्वचषकही भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला. 2013 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.

धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने जिंकले 5 वेळा जेतेपद-

धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. तरीही त्याने आयपीएलमध्ये खेळणे सुरू ठेवले आहे. गेल्या मोसमात (IPL 2023) कर्णधार असताना धोनीने चेन्नई सुपर किंग्सला विजेतेपद मिळवून दिले, जी संघाची पाचवी ट्रॉफी होती. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आतापर्यंत पाचही ट्रॉफी जिंकल्या आहेत. मात्र, या हंगमात धोनी चेन्नईचे नेतृत्व करत नाही. यंदाच्या मोसमात ऋतुराज गायकवाड चेन्नईचा कर्णधार आहे. आता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली संघ यंदाच्या मोसमात कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

शाहरुख खानची गौतम गंभीरला ऑफर

गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्समध्ये परतलाय. खेळाडू म्हणून नाही तर मेंटॉर म्हणून तो काम पाहतोय. गौतम गंभीर कोलकात्याचा सर्वात यशस्वी कर्णधार राहिलाय. गौतमच्या नेतृत्वात कोलकात्यानं दोन वेळा चषकावर नाव कोरलेय. कोलकात्यासोबत सात वर्षे प्रवास केल्यानंतर गौतम गंभीरने दिल्लीच्या ताफ्यात जाण्याचा निर्णय घेतला. आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर गौतम गंभीरने क्रिकेटचे धडे देण्यास सुरुवात केली. लखनौसंघासोबत तो मेंटॉर म्हणून काम पाहत होता. लखनौला दोन्ही हंगामात प्लेऑफमध्ये नेहण्यात त्याचा सिंहाचा वाटा राहिला. आपल्या हुकमी एक्क्याला माघारी बोलवण्यासाठी शाहरुख खानने कंबर कसली होती. रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानने गौतम गंभीरला कोलकात्याच्या ताफ्यात माघारी परतण्यासाठी चक्क ब्लँक चेक ऑफर केला होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Shinde Satara Speech : खरी शिवसनेना कुणाची हे सिद्ध झालंय, मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात जोरदार भाषणBhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Embed widget