CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नई आयपीएल 2023 चा महाविजेता, धोनीच्या संघाचा दणदणीत विजय
CSK vs GT IPL 2023 Final LIVE Score: आज आयपीएल 2023 चा महामुकाबला (IPL 2023 Final) चेन्नई आणि गुजरात (GT vs CSK) यांच्यात रंगणार असून या स्पर्धेचा महाविजेता आज ठरणार आहे
LIVE
Background
IPL Final 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा विजेता मिळण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत. गतविजेता गुजरात आणि चार वेळचा विजेता चेन्नई यांच्यामध्ये आयपीएल 2023 ची फायनल रंगणार आहे. यंदाच्या हंगामाची सुरुवातही याच दोन संघामध्ये झाली होती. रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हार्दिक पांड्या आणि धोनी यांच्यामध्ये लढत होणार आहे. दोन्ही संघातील हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघामध्ये अनुभवी आणि युवा खेळाडूंचा भरणा आहे. कागदोपत्री दोन्ही संघ तुल्यबळ दिसत आहेत.
पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरातचा पराभव
पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सला पराभवाचा सामना करावा लागला. शेवटच्या सामन्यात गुजरातला चेन्नई सुपर किंग्स संघाचं आव्हान होतं. गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांच्यातील 87 धावांच्या सलामीच्या भागीदारीमुळे चेन्नई (CSK) संघाने 20 षटकांत सात गडी गमावून 172 धावा केल्या. गुजरातने (GT) फलंदाजीत काही बदल केले, पण याचा त्यांना फायदा झाला नाही. शुभमन गिलने 38 चेंडूत 42 धावा केल्या पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. गुजरात संघ 20 षटकात केवळ 157 धावा करून सर्व बाद झाला. चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्स विरुद्धचा सामना 15 धावांनी खेळ जिंकला.
IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
चेन्नई आणि गुजरात यांच्यात महामुकाबला
आयपीएल 2023 (IPL 2023) च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सचा पराभव केला. या विजयानंतर चेन्नई सुपर किंग्सने थेट अंतिम फेरी गाठली. एलिमिनेटर सामन्यात त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला आणि मुंबई इंडियन्स क्वालिफायर 2 मध्ये पोहोचला. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्सकडून पराभवाला सामोरे जावे लागले. आता अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने असतील.
चेन्नईची संभावित प्लेईंग 11
ऋतुराज गायकवाड, डेवोन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, शिवम दुबे, मोइन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कप्तान और विकेटकीपर), दीपक चाहर, तुषार देशपांडे आणि महेश तीक्ष्णा
गुजरात टायटन्स संभावित प्लेईंग 11 :
वृद्धीमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी
CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नई यंदाचा महाविजेता
CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नई यंदाचा महाविजेता
CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला एका चेंडूत चार धावांची गरज
CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला एका चेंडूत चार धावांची गरज
CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला 2 चेंडूत 10 धावांची गरज
CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला 2 चेंडूत 10 धावांची गरज
CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला 3 चेंडूत 11 धावांची गरज
CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला 3 चेंडूत 11 धावांची गरज
CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला 4 चेंडूत 12 धावांची गरज
CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला 4 चेंडूत 12 धावांची गरज