(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2023 : हेनरिक क्लासेनचा जाडेजाला धक्का, मयंकची सुटली कॅच; मग जड्डूनं केलं असं काही की... पाहा Video
CSK vs SRH IPL 2023 : सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा रविंद्र जाडेजा (Ravindra Jadeja) आणि सनरायजर्स हैदराबादचा खेळाडू हेनरिक क्लासेनच्या (Heinrich Klaasen) यांच्यात भरमैदानात वाद झाल्याचं दिसून आलं
Ravindra Jadeja, Heinrich Klaasen Clash : आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) 29 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (CSK) सनरायजर्स हैदराबादवर (SRH) विजय मिळवला. हा सामना चेन्नईने सात विकेट्सने जिंकला. दरम्यान, या सामन्यात (CSK vs SRH) चेन्नई सुपर किंग्सचा खेळाडू रविंद्र जाडेजा (Ravindra Jadeja) आणि सनरायजर्स हैदराबादचा खेळाडू हेनरिक क्लासेनच्या (Heinrich Klaasen) यांच्यात भरमैदानात वाद झाल्याचं दिसून आलं.
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल सामन्यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. याच कारण म्हणजे क्लासेन आणि जडेजामधील वाद आहे. पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या हैदराबादचा फलंदाज हेनरिक क्लासेन आणि चेन्नईचा फिरकीपटू रविंद्र जाडेजा यांच्यात बाचाबाची झाली. क्लासेनच्या चुकीमुळे हा वाद सुरू झाला, ज्यावर रविंद्र जाडेजा चांगलाच संतापलेला दिसून आला आणि या रागाच्या भरातच त्याने विकेट घेतली.
पहिल्या डावात हैदरबादच्या फलंदाजी दरम्यान, रविंद्र जाडेजा डावातील 14 व्या षटकात चेन्नईकडून फलंदाजी करत होता. पहिल्याच चेंडूवर जाडेजा मयंक अग्रवालला झेलबाद करणार होता. पण या चेंडूवर मयंक अग्रवालचा झेल घेण्यासाठी जाडेजा पुढे गेल्यावर हेनरिक क्लासेन त्याच्यासमोर आला. यावेळी जाडेजाला क्लासेनचा धक्का लागला आणि क्लासेनमुळे जाडेजाला मयंकचा हा झेल पकडता आला नाही.
पाहा व्हिडीओ : नेमकं काय घडलं?
— IPLT20 Fan (@FanIplt20) April 21, 2023
व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसून येईल की, चेंडू टाकल्यानंतर मयंक अग्रवाल त्यावर कट मारतो. त्यानंतर जाडेजा हा झेल पकडण्यासाठी पुढे सरसावतो. पण त्यावेळी नेमका क्लासेनमध्ये येतो. परिणामी जाडेजाचा झेल सुटतो आणि तो धक्का लागून जमिनीवर खाली पडतो. या घटनेमुळे जाडेजा क्लासेनवर चांगलाच चिडतो आणि त्या दोघांमध्ये बाचाबाची होते. मात्र जाडेजा संधी न सोडता लगेच आपला राग क्लासेनवर काढतो.
जाडेजा आणि क्लासेन यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी अंपायरने दोघांनाही थांबवलं. प्रकरण इथेच संपलं नाही. याच षटकातील पाचव्या चेंडूवर जडेजाने मयंकला तंबूत पाठवून आपला राग काढला. म्हणजेच क्लासेनची सगळी मेहनत व्यर्थ गेली. मयंक अग्रवाल पॅव्हेलियनमध्ये परतत असताना जाडेजा पुन्हा एकदा क्लासेनकडे रागाने टक लावून पाहत होता. जाडेजा आणि क्लासेन यांच्यातील बाचाबाची आणि टशनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
IPL 2023 : धोनीची क्रिकेटमधून निवृत्ती? चेपॉकमध्ये 'कॅप्टन कुल'चा मोठा खुलासा, म्हणाला...