(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CSK Playoff Scenario: चेन्नईचं 3 सामने शिल्लक, टॉप 4 मध्ये स्थान कसं निश्चित करणार, जाणून घ्या प्लेऑफचं समीकरण
CSK Playoff Scenario: आयपीएल स्पर्धा ऐन रंगात आली आहे. चेन्नईचा संघ प्लेऑफसाठी पात्र होईल का? याची चर्चा सुरु आहे.
IPL 2024 Playoff Scenarios : आयपीएल स्पर्धा जसजशी पुढे जात आहे, तसं तसं प्लेऑफचं समीकरण स्पष्ट होत आहे. रविवारी चेन्नई सुपर किंग्सनं पंजाब किंग्सचा 28 धावांनी पराभव केला. यंदाच्या हंगामातील चेन्नईचा हा सहावा विजय ठरला. 12 गुणांसह चेन्नईनं तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. पण इतर संघाचे सामने अद्याप शिल्लक आहेत, त्यामुळे टॉप-4 चं समीकरण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कोलकाता आणि राजस्थान या दोन संघाचं प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित मानले जातेय. पण उर्वरित दोन जागांसाठी सात संघामध्ये चूरस आहे. त्यामध्ये तीन संघ सर्वात पुढे आहेत. यामध्ये चेन्नई, हैदराबाद आणि लखनौ या संघाचा समावेश आहे. पण चेन्नईला प्लेऑपमध्ये पोहचण्यासाठी काय करावं लागेल, त्यांचं समीकरण काय असेल... याबाबतच्या शक्यता जाणून घेऊयात..
चेन्नई सुपर किंग्स प्लेऑफमध्ये कसं पोहचणार ? IPL 2024 CSK Playoff Scenarios
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सने यंदाच्या हंगामात सरासरी कामगिरी केली आहे. चेन्नईला 11 सामन्यात सहा विजय आणि पाच पराभवाचा सामना करावा लागलाय. लीग स्टेजमध्ये चेन्नईचे अद्याप तीन सामने शिल्लक आहेत. चेन्नईने उर्वरित तीन सामन्यात विजय मिळवला तर ते सहज प्लेऑफसाठी पात्र ठरतील. ज्या संघाचे 16 गुण होतात, तो संघ प्लेऑफमध्ये पात्र ठरतो. पण सीएसकेला आपला रनरेट आणखी चांगला करावा लागेल. राजस्थान आणि कोलकाता यांचे सध्या 16 गुण आहेत, त्यांचं प्लेऑफचं स्थान निश्चित मानले जातेय. तर दोन जागासाठी चेन्नई, हैदराबाद, लखनौ, दिल्ली यांच्यामध्ये प्रामुख्यानं लढत आहे. त्याशिवाय आरसीबी, पंजाब आणि गुजरात यांच्याकडेही अद्याप प्लेऑफची संधी आहेच. पण त्यासाठी त्यांना इतर संगाच्या कामगिरीवर अवलंबून आहे.
IPL 2024 Playoffs chances:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 5, 2024
RR - 99%.
KKR - 98%.
SRH - 75%.
CSK - 60%.
LSG - 50%.
DC - 12%.
RCB - 3%.
PBKS - 2%.
GT - 1%.
MI ~ 0%.
चेन्नईचे तीन सामने कुणासोबत -
चेन्नईचे आता तीन सामने शिल्लक आहेत. यातील एक सामना चेन्नईमध्ये आहे, तर दोन सामने प्रतिस्पर्धी संघाच्या घरात खेळायचे आहेत. त्यामुळे चेन्नईपुढे आव्हान खडतर असेल. 10 मे रोजी चेन्नईचा सामना अहमदाबादविरोधात होणार आहे. 12 मे रोजी चेन्नई आणि राजस्थान यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे. तर 18 मे रोजी चेन्नई आणि आरसीबी यांच्यात लढत होणार आहे. आरसीबी आणि गुजरात यांचं प्लेऑफमधील आव्हान खडतर आहे. त्यामुळे हे दोन्ही सामने रंगतदार होण्याची शक्यता आहे.