आयपीएलमध्ये चेन्नईच किंग्स, सर्वाधिक फायनल खेळणारा संघ, पाहा CSK ची आतापर्यंतची कामगिरी
CSK in IPL : धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघापैकी एक आहे. प्लेऑफ आणि चेन्नई हे समीकरण जवळपास निश्चित आहे.
Chennai Super Kings In IPL : धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघापैकी एक आहे. प्लेऑफ आणि चेन्नई हे समीकरण जवळपास निश्चित आहे. प्लेऑफमधील एक जागा, चेन्नईसाठी राखीव असते, असे म्हटल्यास वावगे वाटायला नको. यंदाही चेन्नईने दमदार कामगिरी करत चषकाकडे आगेकूच केली आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये चेन्नईच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. धोनीचे नेतृत्व हीच चेन्नईची जमेची बाजू आहे. चेन्नईने आतापर्यंत चार वेळा चषकावर नाव कोरलेय. तर पाच वेळा उप विजेता राहिली आहे. तर दोन वेळा प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आलेय. आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सर्वात यशस्वी संघ आहे. यंदाही चेन्नईने चॅम्पियनप्रमाणे दमदार खेळ केलाय.
कोणत्या हंगामात चेन्नईची कामगिरी कशी राहिली आहे.. पाहा मागील १६ वर्षातील चेन्नईची कामगिरी -
आयपीएल 2008 (रनरअप)
आयपीएल 2009 (प्लेऑफ)
आयपीएल 2010 (विजेता)
आयपीएल 2011 (विजेता)
आयपीएल 2012 (रनरअप)
आयपीएल 2013 (रनरअप)
आयपीएल 2014 (प्लेऑफ)
आयपीएल 2015 (रनरअप)
आयपीएल 2018 (विजेता)
आयपीएल 2019 (रनरअप)
आयपीएल 2021 (विजेता)
आयपीएल 2023 (फायनल सामना बाकी)
कोणत्या चार वर्षी जिंकला चषक -
आयपीएलच्या चषकावर सर्वाधिक वेळा नाव कोरणाऱ्या यादीत चेन्नईचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईने आतापर्यंत चार वेळा चषखावर नाव कोरलेय. मुंबई इंडियन्स पहिल्या स्थानावर आहे. मुंबईने आतापर्यंत पाच वेळा चषकावर नाव कोरलेय. चेन्नईने चार चषके धोनीच्या नेतृत्वात जिंकली आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईची कामगिरी दमदार राहिली आहे. चेन्नईने पाचव्या चषकाकडे आगेकूच केली आहे. चेन्नईपुढे गुजरातचे आव्हान आहे. आतापर्यत चेन्नईने कोणत्या चार वर्षात चषकावर नाव कोरलेय...
आयपीएल 2010 मध्ये चेन्नई सुपर किंग्स विजेता राहिली.
आयपीएल 2011 मध्ये चेन्नई सुपर किंग्स विजेता राहिली.
आयपीएल 2018 मध्ये चेन्नई सुपर किंग्स विजेता राहिली.
आयपीएल 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्स विजेता राहिली.
आयपीएल 2023 मध्ये चेन्नईची कामगिरी कशी राहिली -
धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईने सर्वात आधी फायनलमध्ये प्रवेश केला. चेन्नई गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर होता. क्वालिफायर १ सामन्यात चेन्नईने गुजरातचा पराभव केला. २३ मे रोजी चेपॉकवर झालेल्या सामन्यात गुजरातचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. यंदाच्या साखळी फेरीत चेन्नईने दमदार कामगिरी केली. चेन्नईने १४ सामन्यात आठ सामने जिंकले आहेत. तर पाच सामन्यात पराभवाचा सामना केलाय. पावसामुळे एक सामना अनिर्णित राहिला होता. चेन्नई १७ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता रविवारी फायनलसाठी चेन्नई आणि गुजरात संघामध्ये लढत होणार आहे.