एक्स्प्लोर
Jain Muni Row: 'एखाद दुसरी व्यक्ति मेला ना काय होतं?', Jain Muni महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य
मुंबईतील कबुतरखान्यांवरून (Kabutarkhana) सुरू असलेल्या वादात जैन मुनी (Jain Muni) कैवल्यरत्न महाराज (Kaivalyaratna Maharaj) यांनी वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. 'एखाद दुसरी व्यक्ति मेला ना काय होतं?' असा संतप्त सवाल कैवल्यरत्न महाराज यांनी विचारला आहे. मुंबईतील कबुतरांसाठी आयोजित केलेल्या 'कबूतर बचाओ धर्मसभेत' ते बोलत होते. यासोबतच, "कबुतराच्या विष्ठेमुळे जीव जाईल का? असं बोलत असतील, तर मी डॉक्टरांना सुद्धा मूर्ख मानतो," असे म्हणून त्यांनी डॉक्टरांचाही अपमान केला. त्यांच्या या वक्तव्यांमुळे एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्यावर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















