CSK IPL 2026 Team Playing XI : चेन्नई सुपर किंग्सचा स्फोटक Full Squad, मुंबईला देणार टक्कर, IPL 2026 साठी अशी असेल सीएसकेची Playing XI, MS धोनी बाहेर?
Chennai Super Kings IPL 2026 Team Playing XI : सीएसकेच्या फ्रेंचायझीने दोन अनकॅप्ड खेळाडू कार्तिक शर्मा आणि प्रशांत वीरसाठी प्रत्येकी 14.2 कोटी रुपयांची मोठी बोली लावली.

IPL 2026 Chennai Super Kings Full Squad : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 साठीची मिनी लिलाव मंगळवारी (16 डिसेंबर) अबू धाबीतील एतिहाद एरिनामध्ये पार पडला. या लिलावात एकूण 77 खेळाडूंवर बोली लागली. लिलावादरम्यान ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू कॅमरून ग्रीनने इतिहास रचला. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाने त्याला तब्बल 25.20 कोटी रुपयांना विकत घेत आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू बनवले.
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सने (CSK Playing XI) आयपीएल 2026 च्या लिलावात एकूण 9 खेळाडू आपल्या ताफ्यात सामील केले. फ्रेंचायझीने दोन अनकॅप्ड खेळाडू कार्तिक शर्मा आणि प्रशांत वीरसाठी प्रत्येकी 14.2 कोटी रुपयांची मोठी बोली लावली. याशिवाय राहुल चाहर, मॅट हेन्री, अकील हुसैन, मॅथ्यू शॉर्ट, जॅक फॉल्क्स, सरफराज खान आणि अमन खान यांनाही संघात स्थान देण्यात आले. मात्र या 9 पैकी किमान 5 खेळाडूंना आयपीएल 2026 मध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
संजू सॅमसन CSK चा नवा विकेटकीपर?
इंडियन प्रीमियर लीग 2026 च्या मिनी ऑक्शननंतर चेन्नई सुपर किंग्सचा संघ जवळपास निश्चित झाल्याचं मानलं जात आहे. मात्र, संघाच्या प्लेइंग इलेव्हन बाबत सध्या मोठी चर्चा सुरू आहे. विशेषतः एमएस धोनी प्लेइंग इलेव्हनमध्ये असणार की नाही, याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
धोनीने मागील काही हंगामांमध्ये गुडघ्याच्या दुखापतीमुळे आणि फिटनेसच्या कारणांमुळे कमी सामने खेळले. त्यामुळे आयपीएल 2026 मध्ये तो फक्त मेंटॉर किंवा इम्पॅक्ट प्लेयरच्या भूमिकेत दिसू शकतो, अशी चर्चा आहे. संजू सॅमसन हा अनुभवी विकेटकीपर-बॅटर असून तो सातत्याने भारतासाठी आणि आयपीएलमध्ये प्रभावी कामगिरी करत आला आहे. जर तो प्लेइंग इलेव्हन मध्ये असेल, तर विकेटकीपिंगची जबाबदारी संजू सॅमसनकडे जाण्याची दाट शक्यता आहे. यामुळेच धोनी बाहेर राहू शकतो, असा अंदाज बांधला जात आहे.
चेन्नई सुपर किंग्सने रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी- (CSK retained player list)
एमएस धोनी, ऋतुराज गायकवाड़, संजू सॅमसन (ट्रेड), शिवम दुबे, डेवाल्ड ब्रेविस, आयुष म्हात्रे, उर्विल पटेल, शिवम दुबे, रामकृष्ण घोष, जेमी ओवर्टन, नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, नाथन एलिस, श्रेयस गोपाल, मुकेश चौधरी, गुरजपनीत सिंह
चेन्नई सुपर किंग्सने पुढील खेळाडूंना रिलीज केले- (CSK released player list)
राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ, शेख रशीद, रचिन रवींद्र, विजय शंकर, कमलेश नागरकोटी, मथीशा पाथिराना.
चेन्नई सुपर किंग्सने ट्रेडद्वारे खरेदी केलेले खेळाडू- (CSK Trade player list)
संजू सॅमसन (राजस्थान रॉयल्सकडून)
आयपीएल 2026 च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सने खरेदी केलेल्या खेळाडूंची यादी- (CSK IPL 2026 Auction)
प्रशांत वीर - 14.20 कोटी रुपये
कार्तिक शर्मा - 14.20 कोटी रुपये
मॅथ्यू शॉर्ट - 1.5 कोटी रुपये
अमन खान - 40 लाख रुपये
झॅक फाउल्क्स - 75 लाख रुपये
सरफराज खान - 75 लाख रुपये
राहुल चहर - 5.20 कोटी रुपये
मॅट हेन्री -2 कोटी रुपये
अकील होसेन -2 कोटी रुपये
From those who built it to those ready to carry it forward
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) December 17, 2025
The Legacy continues 💛
Thank you, OG Lions. Forever grateful 🦁 #WhistlePodu #Yellove pic.twitter.com/J6xibi5y04
चेन्नई सुपर किंग्सचा संपूर्ण संघ - (IPL 2026 CSK Full Squad)
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, एमएस धोनी, संजू सॅमसन, डेवाल्ड ब्रेविस, उर्विल पटेल, शिवम दुबे, जेमी ओव्हरटन, रामकृष्ण घोष, नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, गुरजपनीत सिंग, श्रेयस गोपाल, मुकेश चौधरी, नॅशनल चौधरी, प्रवीण चौधरी, प्रशांत वीर, ए. कार्तिक शर्मा, मॅथ्यू शॉर्ट, अमन खान, सरफराज खान, मॅट हेन्री, राहुल चहर, जॅक फॉल्क्स.
आयपीएल 2026 साठी चेन्नई सुपर किंग्सची कशी असेल Playing XI- (CSK Playing XI IPL 2026)
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, संजू सॅमसन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, प्रशांत वीर,कार्तिक शर्मा, नूर अहमद, राहुल चहर, खलील अहमद, मॅट हेन्री.





















