![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Hardik Pandya : हार्दिक पांड्याला दुहेरी धक्का, मुंबईच्या कॅप्टनवर एका मॅचसाठी बंदी, लाखोंचा दंड, बीसीसीआयचा दणका
Hardik Pandya : मुंबईचा कॅप्टन हार्दिक पांड्याला दुहेरी धक्का बसला आहे. लखनौ विरुद्धच्या मॅचमध्ये स्लो ओव्हर रेट प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
![Hardik Pandya : हार्दिक पांड्याला दुहेरी धक्का, मुंबईच्या कॅप्टनवर एका मॅचसाठी बंदी, लाखोंचा दंड, बीसीसीआयचा दणका bcci bans hardik pandya for one ipl match slap 30 lakh rupees fine mumbai Indians marathi news Hardik Pandya : हार्दिक पांड्याला दुहेरी धक्का, मुंबईच्या कॅप्टनवर एका मॅचसाठी बंदी, लाखोंचा दंड, बीसीसीआयचा दणका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/18/eefb95ca43a136e6109b8f2373117afa1716008347016989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)चा यंदाच्या आयपीएलमधील (IPL 2024) दहावा पराभव लखनौ सुपर जाएंटस विरुद्ध झाला. लखनौ सुपर जाएंटसनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 6 विकेटवर 214 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सनं 6 विकेटवर 196 धावांपर्यंत मजल मारली. या मॅचदरम्यान स्लो ओव्हर रेट प्रकरणी बीसीसीआयनं हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि मुंबईच्या इतर खेळाडूंवर कारवाई केली आहे. हार्दिक पांड्यावर एका मॅचची बंदी घालण्यात आली आहे. मुंबईकडून तिसऱ्यांदा अशा प्रकारची चूक झाल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे.
मुंबईकडून तिसऱ्यांदा चूक झाल्यानं बीसीसीआयनं कठोर कारवाई केली आहे. हार्दिक पांड्यावर एका मॅचची बंदी घालण्यात आली आहे. आयपीएलच्या 18 व्या हंगामात एका मॅचला हार्दिक पांड्याला मुकावं लागणार आहे. हार्दिक पांड्याला बीसीसीआयनं 30 लाख रुपयांचा दंड केला आहे.
हार्दिक पांड्यानं संघ बदलला तरी बंदी कायम
हार्दिक पांड्या पुढच्या हंगामात दुसऱ्या संघाकडून खेळला तरी त्याच्यावर ही बंदी कायम राहणार आहे.यंदाच्या आयपीएलमध्ये तिसऱ्यांदा मुंबई इंडियन्सला स्लो ओव्हर रेट प्रकरणी कारवाईला सामोरं जावं लागलं आहे.
बीसीआयनं हार्दिक पांड्यावर 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय संघातील खेळाडूंना ज्यमध्ये इम्पॅक्ट प्लेअचा देखील समावेश असेल त्यांनी 12 लाख रुपये किंवा मॅच फीच्या 50 टक्के रक्कम जी कमी असेल ती भरावी लागणार आहे.
मुंबई इंडियन्सला यापूर्वी देखील स्लो ओव्हर रेट प्रकरणी कारवाईला सामोरं जावं लागलं होतं. दुसऱ्या वेळी हार्दिक पांड्याला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
मुंबई इंडियन्सला लखनौ सुपर जाएंटस विरुद्ध 18 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या मॅचसह मुंबईचा यंदाच्या आयपीएलमधील प्रवास संपला आहे. मुंबईनं 14 पैकी 4 मॅचमध्ये विजय मिळवला तर त्यांना 10 मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे.
दरम्यान, आयपीएलच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी यावर्षी विविध संघांवर कारवाई करण्यात आलेली आहे. दिल्ली कॅपिटल्सनं देखील स्लो ओव्हर रेट प्रकरणी कारवाईचा सामना केला आहे. दिल्लीचा कॅप्टन रिषभ पंतवर देखील एका मॅचची बंदी घालण्यात आली होती. आता हार्दिक पांड्यावर देखील एका मॅचची बंदी घालण्यात आली आहे. दहाव्या पराभवानंतर आयपीएल कडून एका मॅचची बंदी घालण्यात आल्यानं दुसरा धक्का बसला आहे.
संबंधित बातम्या :
मोठी बातमी : गौतम गंभीरला टीम इंडियाचा कोच होण्याचा आग्रह, BCCI ची विनंती मान्य होणार?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)