एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Election Voting 2024: राज्यातील 15 मतदारसंघांत खटाखट मतदान, मुंबईत किती टक्के मतदान?

Maharashtra Voting turnout: राज्यातील कोणत्या मतदारसंघात मतदान जास्त झाले आहे,याची आकडेवारी समोर आली आहे.

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला बुधवारी सकाळी सात वाजता सुरुवात झाली. त्यानंतर राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये वेगाने मतदान होताना दिसत आहे. आतापर्यंत राज्यात सरासरी 18.14 टक्के मतदान झाले आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत गडचिरोतील आरमोरी मतदारसंघात सर्वाधिक 30.75 टक्के मतदान झाले आहे. त्यापाठोपाठ अहेरी मतदारसंघात 30.06 टक्के तर उरणमध्ये 29.26 टक्के इतके मतदान झाले आहे. यंदा निवडणूक आयोगाने मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्याचा कितपत फायदा होणार, हे थोड्यावेळात कळेल. मात्र, सकाळी 11व वाजेपर्यंत राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये 20 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते. 

सर्वाधिक मतदान झालेले मतदारसंघ

१ आरमोरी  ३०.७५
२ अहेरी   ३०.०६
३ उरण    २९.२६
४ आमगाव   २९.०६
५ अर्जुनी-मोरगाव २७.४
६ दिंडोरी  २६.४१
७ सिल्लोड  २६.२८
८ करवीर  २६.१३
९ शहादा २४.९८
१० वणी २४.८८
११ चिमूर २४.६८
१२ नवापूर २४.५८
१३ चिपळूण २४.५७
१४ गुहागर २४.३६
१५ ब्रह्मपुरी २४.१५

मुंबईत किती टक्के मतदान?

राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सकाळी ७ ते ११ दरम्यान 15.78 टक्के मतदान झाले. तर मुंबई उपनगरात सकाळी 11 वाजेपर्यंत 17.99 टक्के मतदान झाले. मुंबई शहरात सर्वाधिक मतदान मलबार हिल मतदारसंघात झाल्याचे दिसून आले. सकाळी 11 वाजेपर्यंत मलबार हिल मतदारसंघात १९.७७ टक्के मतदान झाले. सर्वात कमी मतदान सायन कोळीवाडा मतदारसंघात झाले. याठिकाणी 12.82 टक्के इतका मतदानाचा टक्का नोंदवण्यात आला. मुंबई उपनगरात भांडुप पश्चिम मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 23.42 टक्के मतदान झाले. वांद्रे पूर्व येथे मुंबई उपनगरातील सर्वात कमी मतदान झाले. याठिकाणी १३.९८ टक्के मतदानाची टक्केवारी नोंदवण्यात आली.

बारामती मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला

पुणे जिल्ह्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 21 विधानसभा मतदारसंघात सरासरी 15.64  टक्के मतदान झाले. सर्वात कमी मतदान हडपसर आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात 11.46 टक्के तर सर्वाधिक जास्त मतदान १८.८१ टक्के मतदान हे बारामतीत झाले.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे

अहमदनगर -  18.24 टक्के
अकोला - 16.35 टक्के
अमरावती - 17.45 टक्के 
औरंगाबाद- 18.98 टक्के
बीड - 17.41 टक्के
भंडारा- 19.44 टक्के
बुलढाणा- 19.23 टक्के
चंद्रपूर- 21.50 टक्के
धुळे - 20.11 टक्के
गडचिरोली- 30 टक्के
गोंदिया - 23.32 टक्के
 हिंगोली -19.20 टक्के
 जळगाव - 15.62 टक्के
जालना- 21.29 टक्के
कोल्हापूर- 20.59 टक्के
लातूर 18.55 टक्के
मुंबई शहर- 15.78 टक्के
मुंबई उपनगर- 17.99 टक्के
नागपूर - 18.90 टक्के
नांदेड - 13.67 टक्के
नंदुरबार- 21.60 टक्के
नाशिक - 18.71 टक्के
उस्मानाबाद- 17.07 टक्के
पालघर- 19.40 टक्के
परभणी- 18.49 टक्के
पुणे - 15.64 टक्के
रायगड - 20.40 टक्के
रत्नागिरी- 22.93 टक्के
सांगली - 18.55 टक्के
सातारा -18.72 टक्के
सिंधुदुर्ग - 20.91 टक्के
सोलापूर - 15.64 टक्के
ठाणे - 16.63 टक्के
वर्धा - 18.86 टक्के
वाशिम - 16.22 टक्के
यवतमाळ -16.38 टक्के

आणखी वाचा

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: सातारा जिल्ह्यात सकाळी 11 वाजेपर्यंत कोणत्या मतदारसंघात किती मतदान?

महत्त्वाच्या बातम्या

Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
Embed widget