Exit poll: मतदानानंतरचा एक्झिट पोल कधी अन् कुठं पाहाल? राज्यात महायुती की महाविकास आघाडी, कुणाला कौल
Exit poll: राज्यातील 288 मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. त्यानुसार, सायंकाळी 6 वाजता सर्वच उमेदवारांचे भवितव्य मतदानपेटीत बंद होणार आहे.
मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून उत्सुकता लागलेला दिवस अखेर उजाडला असून राज्यातील 288 विधानसभा (Vidhansabha) मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यानुसार, काही अपवाद वगळता सर्वच मतदारसंघात सकाळपासूनच मतदारांनी गर्दी केली असून शांततेत मतदान सुरू आहे. त्यामुळे, आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान झाल्यानंतर निवडणूक निकालाचे एक्झिट पोल (Exit Poll) येणार आहेत. त्यामुळे, राज्यात कोणाची हवा, कोणत्या पक्षाला मतदारांची पसंती, महायुती की महाविकास आघाडी कोणाला मिळणार कौल याबाबतची संपूर्ण माहिती मतदान झाल्यानंतर सायंकाळी 6 नंतर सर्वांना पाहायला मिळणार आहे. त्यासाठी, एबीपी माझाच्या वेबसाईटला फॉलो करा. एबीपी माझा वेबसाईट www.abpmajha.com एबीपी माझा युट्यूब चॅनेल आणि एबीपी माझाच्या टेलिव्हीजन चॅनेलवर तुम्हाला एक्झिट पोलची सर्वच आकडेवारी पाहायला मिळेल.
राज्यातील 288 मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. त्यानुसार, सायंकाळी 6 वाजता सर्वच उमेदवारांचे भवितव्य मतदानपेटीत बंद होणार आहे. राज्यातील 288 विधानसभेच्या जागांसाठी 4,136 उमेदवार रिंगणात असून राजकीय पक्षांपेक्षा अपक्षांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस महायुती व काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट महाविकास आघाडी यांच्यातच प्रमुख लढत आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रथमच तीन तीन पक्ष एकत्र आल्याने निवडणूक निकालाचा अंदाज बांधणं कठीण झालं आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी आलेल्या प्रीपोल निवडणूक एक्झिट पोलमध्ये महायुतीचा सत्ता मिळेल, असा अंदाज दर्शवण्यात आला होता. त्यामुळे, पोस्ट पोल म्हणजेच मतदानानंतरच्या एक्झिट पोलकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महायुतीमध्ये भाजप 148, शिंदेंची शिवसेना 81, अजित पवारांची राष्ट्रवादी 59 जागांवर निवडणूक लढवत आहे. तर, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 101, शिवसेना युबीटी 95 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 86 जागांवर निवडणूक लढवत आहे. त्यामुळे,पक्षनिहाय कोणत्या पक्षाला जास्त जागा मिळतील, कोणाचा स्ट्राईक रेट अधिक राहिले, हेही पाहणे महत्त्वाचे आहे. यांसह, एमआयएमने 17 जागांवर उमेदवार उभे केले आहेत, तर, बहुजन समाज पक्षाने 237 जागांवर उमेदवार दिले आहेत. वंचित बहुजन आघाडी, मनसे आणि परिवर्तन महाशक्ती पक्षाकडून मोठ्या संख्येने उमेदवार देण्यात आले आहेत.
एक्झिट पोल कुठं व कधी पाहाल
मतदान प्रकिया पूर्ण झाल्यानंतर आज 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता एक्झिट पोलचे आकडे समोर येतील
एबीपी माझाच्या वेबसाईटवर तुम्हाला याबाबत सर्व माहिती मिळेल
एबीपी माझाच्या युट्यूब चॅनेल व टेलिव्हिजन चॅनेलवरही तुम्हाला सर्व अपडेट मिळतील. तसेच, एबीपी माझाच्या सोशल मीडिया फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम साईटवरही हे पाहायला मिळेल
हेही वाचा
Baramati Voting : पुणे जिल्ह्यात सकाळी 11 पर्यंत बारामतीत सर्वाधिक मतदान, कोणता दादा टेन्शनमध्ये?