Jharkhand Election 2024 : मतदान करायला लागतंय! महाराष्ट्राच्या तुलनेत झारखंमध्ये मतदानाची टक्केवारी सुसाट, पहिल्या चार तासातच मतदारांचा जोर
Jharkhand Election 2024 : महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व 288 जागांसाठी मतदान होत आहे. 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत राज्यात 18.14 टक्के मतदान झाले होते.
रांची (झारखंड) : झारखंड विधानसभा (Jharkhand Election 2024) निवडणुकीच्या शेवटच्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांतील 38 जागांवर आज मतदान होत आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत 31.37 टक्के मतदान झाले आहे. 14,218 मतदान केंद्रांपैकी 31 बूथवर दुपारी 4 वाजता मतदान संपेल. महाराष्ट्राच्या तुलनेत झारखंडमध्ये पहिल्या चार तासात जोरदार मतदान झालं आहे. महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 31.37 टक्के मतदान झालं आहे. दुसऱ्या टप्प्यातील 38 जागांपैकी भाजप 32 जागांवर NDA आणि AJSU 6 जागांवर निवडणूक लढवत आहे. तर, इंडिया आघाडीमध्ये JMM 20 जागांवर, काँग्रेस 12 जागांवर, RJD 2 आणि ML 4 जागांवर निवडणूक लढवत आहे.
महाराष्ट्रात सकाळी 11 वाजेपर्यंत राज्यात 18.14 टक्के मतदान
दुसरीकडे, महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व 288 जागांसाठी मतदान होत आहे. मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 अशी आहे. 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत राज्यात 18.14 टक्के मतदान झाले होते. गडचिरोलीमध्ये सर्वाधिक 30 टक्के आणि नांदेडमध्ये सर्वात कमी 13.67 टक्के मतदान झाले. त्यामुळे महाराष्ट्रात दुपारपर्यंत मतदानाचा वेग वाढेल, असा अंदाज आहे. अनेक मतदारसंघावर सकाळपासून रांगा लागल्या आहेत.
झारखंडमध्ये काही मतदारसंघावर हाणामारी
दरम्यान, झारखंडमधील धनबादमध्ये खासदार धुल्लू महतो यांचा भाऊ आणि बागमारा येथील भाजप उमेदवार शत्रुघ्न महतो आणि अपक्ष उमेदवार रोहित यादव यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. मतदारांना स्लिप वाटपावरून हाणामारी झाली. पोलिसांनी कडक कारवाई करून प्रकरण शांत केले. जामतारा येथे संथ गतीने मतदान झाल्यामुळे बूथ क्रमांक 344 चे पीठासीन अधिकारी काढून टाकण्यात आले आहेत. तर भाजपच्या तक्रारीवरून मधुपूर येथील बूथ क्रमांक 111 चे पीठासीन अधिकारी बदलण्यात आले आहेत. तपासादरम्यान तो मतदान बुथजवळ आढळून आला. हे निवडणूक आयोगाच्या नियमांच्या विरोधात आहे.
यापूर्वी, गोड्डा येथील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केली होती की मधुपूर बूथवर जेएमएमच्या बाजूने मतदान केल्याबद्दल एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. त्यांच्या या दाव्यानंतर निवडणूक आयोगाने एक निवेदन जारी केले आहे. याशिवाय खासदार दुबे यांनी सकाळी एक व्हिडिओ पोस्ट केला आणि दावा केला की झारखंड सरकारचे मंत्री हाफिझुल हसन यांचा भाऊ खुलेआम पैसे वाटप करत आहे. निवडणूक आयोग हतबल झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या