Avesh Khan : 'सामन्यावेळी आई रुग्णालयात दाखल', लखनौच्या विजयाचा शिलेदार आवेश खानची माहिती, म्हणाला...
IPL 2022 SRH VS LSG : आवेश खान सोमवारी जेव्हा हैदराबादच्या फलंदाजांची नाचक्की करत होता, तेव्हा त्याची आई रुग्णालयात दाखल होती.
SRH VS LSG IPL 2022 : आयपीएलमध्ये सोमवारी झालेल्या सनरायजर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध लखनौ सुपर जायंट्सच्या (LSG) सामन्यात लखनौचा गोलंदाज आवेश खान (Avesh Khan) याची धमाकेदार गोलंदाजी पाहायला मिळाली. मात्र, तुम्हाला माहिती नसेल की, ज्यावेळी आवेश खान फलंदाजांची नाचक्की करत होता त्यावेळी त्याच्या मनात मॅच सोडून दुसऱ्याचं विचारात होता. आता त्यानं याबाबत मोठा खुलाास केला आहे. आवेश खानने सांगितलं आहे की, तो मॅच खेळत असताना त्याची आई रुग्णालयात होती. आवेशची आई रुग्णालयात दाखल आहे.
आवेशने लखनौसाठी हैदरबादच्या 4 विकेट घेतल्या. यामुळे लखनौने हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात विजयाला गवसणी घातली. या सामन्यातील तुफान कामगिरीमुळे तो 'मॅन ऑफ द मॅच' ठरला. दरम्यान, आवेशने सामन्यात त्याला मिळालेल्या यशाचं श्रेय त्याच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आईला दिले आहेत. आवेशने सांगितले की, 'माझी आई सध्या रुग्णालायत दाखल आहे. मला या सामन्यात मिळालेल्या यशाचं श्रेय मी आईला देतो, तिने रुग्णालयात दाखल असूनही माझ्या आईने मला चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन दिले.'
Stylish fifty 👌
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2022
Game-changing 4️⃣-wicket haul 💥
Special dedication 🤗@Avesh_6 & @HoodaOnFire - stars of the @LucknowIPL's win over #SRH - discuss their favourite moments from the #SRHvLSG clash. 👍👍 - By @ameyatilak
Full interview 🎥 🔽 #TATAIPLhttps://t.co/C0nlc61PbZ pic.twitter.com/sUgmRaVTkU
आवेशने लखनौला मिळवून दिला विजय
आवेश खानने एकाच ओव्हरमध्ये हैदराबादच्या झोळीतील सामना लखनौच्या दिशेने वळवला. 18 व्या ओव्हरमध्ये आवेश खान गोलंदाजीसाठी आला तेव्हा सामना सनरायझर्स हैदराबादच्या हातात होता. निकोलस पूरन उत्कृष्ट फॉर्ममध्ये पाहायला मिळाला. मात्र, आवेश खानने निकोलस पूरनला बाद केले. शिवाय नंतरच्या चेंडूवर लगेचच पुढचा फलंदाज अब्दुल समदलाही बाद केले.
View this post on Instagram
महत्त्वाच्या बातम्या :
- Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 1086 रुग्ण, 71 जणांचा मृत्यू
- UNSC Meeting on Ukraine : भारताकडून बुचा नरसंहाराचा निषेध; निष्पक्ष तपास आवश्यक, संयुक्त राष्ट्र परिषदेत रशियावर नाव न घेता निशाणा
- Twitter Edit Button : एलन मस्क यांच्या ट्विटर पोलनंतर ट्विटरचं मिश्किल ट्वीट; म्हणालं, एडिट फिचरची चाचणी मागील एका वर्षापासून सुरु
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha