Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 1086 रुग्ण, 71 जणांचा मृत्यू
Coronavirus Cases Today in India : देशात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे 1086 नवीन रुग्ण आढळले असून 71 जणांचा मृत्यू झाला आहे. काल कोरोनाचे 795 रुग्ण नोंदवले गेले.
![Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 1086 रुग्ण, 71 जणांचा मृत्यू coronavirus cases in india today new cases of covid deaths recorded in last 24 hour Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 1086 रुग्ण, 71 जणांचा मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/21/976b7d142be15f200447b022b49c45a5_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Coronavirus Cases Today in India : आज भारतात कोरोना विषाणूच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 1086 नवीन रुग्ण आढळले असून 71 जणांचा मृत्यू झाला आहे. काल कोरोनाचे 795 रुग्ण नोंदवले गेले आणि 58 जणांचा मृत्यू झाला. जाणून घ्या देशातील कोरोनाची सध्याची परिस्थिती काय आहे.
सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 871 इतकी कमी झाली
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी दिवसभरात देशात 1 हजार 198 रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यानंतर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 871 इतकी झाली आहे. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 21 हजार 487 झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 97 हजार 567 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.
आतापर्यंत 185 कोटींहून अधिक डोस देण्यात आले
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे 185 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. मंगळवारी दिवसभरात 15 लाख 49 हजार 699 डोस देण्यात आले. देशात आतापर्यंत 185 कोटी 4 लाख 11 हजार 569 डोस लसीचे देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या 60 वर्षांवरील लोकांना 2 कोटींहून अधिक (2 कोटी 37 लाख 72 हजार 909) कोरोना लसी देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- BJP Foundation Day : आज भाजपचा 42वा स्थापना दिवस, बहुमताच्या सरकारमधून काढल्यानंतर दोन दिवसात वाजपेयी-अडवाणींनी केली भाजपची स्थापना
- UNSC Meeting on Ukraine : भारताकडून बुचा नरसंहाराचा निषेध; निष्पक्ष तपास आवश्यक, संयुक्त राष्ट्र परिषदेत रशियावर नाव न घेता निशाणा
- Twitter Edit Button : एलन मस्क यांच्या ट्विटर पोलनंतर ट्विटरचं मिश्किल ट्वीट; म्हणालं, एडिट फिचरची चाचणी मागील एका वर्षापासून सुरु
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)