IPL Auction 2021 | अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात; कितीची लागली बोली?
IPL Auctions 2021 : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरवर बोली लावत मुंबई इंडियन्सने त्याचा आपल्या संघात समावेश केला आहे. अर्जुनची बेस प्राइज 20 लाख रुपये ठेवण्यात आली होती. 21 वर्षांचा अर्जुन पहिल्यांदाच आयपीएलच्या लिलावात सहभागी झाला होता.
IPL Auctions 2021 : भारतातील दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 च्या सीझनसाठी लिलावात खरेदी केलं आहे. मुंबई इंडियन्सने युवा ऑलराऊंडर अर्जुन तेंडुलकरचा 20 लाख रुपयांची बोली लावून आपल्या संघात समावेश केला आहे. अर्जुनची बेस प्राइज 20 लाख रुपये ठेवण्यात आली होती. 21 वर्षांचा अर्जुन पहिल्यांदाच आयपीएलच्या लिलावात सहभागी झाला होता.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, लिलावापूर्वी सोशल मीडियावर चाहत्यांनी अर्जुन मुंबई इंडियन्सकडून खेळणार असल्याची शक्यता वर्तवली होती. कारण मुंबई इंडियन्समधूनच अर्जुनचे वडिल सचिन तेंडुलकरही खेळले होते. सचिन सध्या मुंबई इंडियन्स संघाचा मेंटॉरही आहे. अर्जुनही याच संघाच्या टीमच्या कँपमध्ये सहभागी झाला होता. दुबईमध्ये खेळवण्यात आलेल्या गेल्या सीझनदरम्यान, अर्जुन मुंबई इंडियन्सच्या संघासोबतच होता.
ऑलराऊंडर रोल
अर्जुन टीममध्ये ऑलराऊंडर म्हणून खेळणार आहे. अर्जुन केवळ मोठे शॉर्ट्स खेळण्यासाठीच नव्हे, तर आपल्या वेगवान गोलंदाजीने टीमसाठी ऑलराऊंडर म्हणून महत्त्वाची भूमिका निभावू शकतो.
IPL Auction 2021 LIVE UPDATES : आयपीएलच्या लिलावासंदर्भातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर...
ब्रँड व्हॅल्यू
काही दिवसांपूर्वी सैय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी अर्जुनने सिनियर प्लेयर म्हणून डेब्यू केला होता. अर्जुन तेंडुलकरची सर्वा मोठी ब्रँड व्हॅल्यू म्हणजे, त्याचे वडील. जगातील सर्वात महान क्रिकेटर्सपैकी एक म्हणजे, सचिन तेंडुलकर. अर्जुन सचिन तेंडुलकरचा मुलगा. सचिनचे जगभरात अनेक चाहते आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्समध्ये अर्जुनचं असणं टीमसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
अर्जुनने सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून क्रिकेट करिअरची सुरुवात केली होती. तसेच अनेक टुर्नामेंटमध्ये तो चांगली खेळी करु शकला नव्हता. तर विजय हजारे ट्रॉफीसाठी संघ निवडीदरम्यान, अर्जुनला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. परंतु, आता MIG सामन्यामधून त्याने शानदार कमबॅक केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- IPL 2021 Auction | शाहरुख खान प्रिती झिंटाच्या जाळ्यात; पंजाबकडून खेळणार
- IPL 2021 Auction | टीम इंडियाचा ऑलराऊंडर Shivam Dube राजस्थान रॉयल्समध्ये; किती कोटींची लावली बोली?
- Glenn Maxwelln साठी CSK अन् RCB मध्ये चढाओढ; RCB ने मोजले तब्बल...
- IPL Auction, CHRIS MORRIS sold | ख्रिस मॉरिस आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू; RR ने लावली इतक्या कोटींची बोली