एक्स्प्लोर

IPL Auction, CHRIS MORRIS sold | ख्रिस मॉरिस आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू; RR ने लावली इतक्या कोटींची बोली

IPL Auction, CHRIS MORRIS sold : ख्रिस मॉरिस आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू ठरला आहे. यापूर्वी टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंहवर सर्वाधिक बोली लावण्यात आली होती.

IPL Auction, CHRIS MORRIS sold | साऊथ आफ्रिकेचा फास्ट बॉलिंग ऑलराउंडर ख्रिस मॉरिस आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू बनला आहे. ख्रिस मॉरिसला राजस्थान रॉयल्सने 16.25 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. याआधी आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बोली युवराज सिंह (16 कोटी) याच्यावर लावण्यात आली होती. मॉरिस यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघाचा हिस्सा होता. त्याला आयपीएल 2020 च्या लिलावात RCB ने 10 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं.

यापूर्वी टीम इंडियाचा युवा खेळाडू शिवम दुबे याला राजस्थान रॉयल्सने 4.40 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं आहे. शिवम आयपीएल 2020 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघाचा हिस्सा होता. शिवमने टीम इंडियासाठी एक वनडे आणि 10 टी20 इंटरनॅशनल सामने खेळले आहेत.

इंग्लंडचा ऑलराऊंडर मोईन अलीला चेन्नई सुपर किंग्सने सात कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं आहे. मोईन आयपीएल 2020 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा हिस्सा होता. परंतु, आता तो एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना दिसणार आहे. तसेच बांग्लादेशचा स्पिन ऑलराउंडर शाकिब अल हसनला कोलकाता नाईट रायडर्सने 3.20 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. शाकिब गेल्या वर्षी आयपीएलमध्ये खेळला नव्हता. शाकिबची बेस प्राइज 2 कोटी रुपये होती.

शाकिबच्या आधी ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला 14.25 कोटी रुपयांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने खरेदी केलं आहे. मॅक्सवेलला खरेदी करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर बंगलोर यांच्यात चढाओढ सुरु होती. परंतु, अखेर सर्वाधिक 14.25 कोटींची बोली लावून बंगलोरने मॅक्सवेलला आपल्या टीममध्ये घेतलं आहे.

IPL Auction 2021 LIVE UPDATES : आयपीएलच्या लिलावासंदर्भातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर... 

अद्याप कोणते खेळाडू अनसोल्ड?

करुण नायर, केदार जाधव, जेसन रॉय आणि एलेक्स हेल्स यांसारख्या मोठ्या खेळाडूंना अद्याप कोणीही खरेदी केलेलं नाही. दरम्यान, दुसऱ्या सेटमध्ये या खेळाडूंवर बोली लावली जाऊ शकते.

संघात किती खेळाडू असू शकतात?

सर्व फ्रँचायझींमध्ये त्यांच्या संघात जास्तीत जास्त 25 खेळाडू आणि किमान 18 खेळाडू घेऊ शकतात. त्याचबरोबर संघात परदेशी खेळाडूंची संख्या आठ असू शकते. महत्त्वाचे म्हणजे आयपीएलच्या आठही फ्रँचायजींनी लिलावापूर्वी 139 खेळाडूंना कायम ठेवले आहे. तर 57 खेळाडूंना त्यांच्या सध्याच्या संघाने रिलीज केलं आहे. सनरायझर्स हैदराबादने सर्वाधिक खेळाडू कायम ठेवले आहेत. त्याच वेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सर्वाधिक खेळाडूंना रिलीज केलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Glenn Maxwelln साठी CSK अन् RCB मध्ये चढाओढ; RCB ने मोजले तब्बल...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget