IPL 2021 Auction | टीम इंडियाचा ऑलराऊंडर Shivam Dube राजस्थान रॉयल्समध्ये; किती कोटींची लावली बोली?
IPL 2021 Auction : आयपीएल 2021 सीझनसाठी टीम इंडियाचा ऑलराऊंडर शिवम दुबेला राजस्थान रॉयल्सने 4.4 कोटी रुपयांची बोली लावून आपल्या ताफ्यात घेतलं आहे. शिवम दुबेची दुबेची बेस प्राइज 50 लाख रुपये होती.
IPL 2021 Auction | इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 सीझनसाठी गुरुवारी चेन्नईमध्ये सुरु असलेल्या लिलावात टीम इंडियाचा ऑलराऊंडर शिवम दुबेला राजस्थान रॉयल्सने 4.4 कोटी रुपयांची बोली लावून आपल्या संघात सहभागी केलं आहे. दुबेची बेस प्राइज 50 लाख रुपये होती. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा माजी ऑलराऊंडर दुबेसाठी सनरायझर्स हैदराबादनेही बोली लावली होती. परंतु, राजस्थान रॉयल्सने 4.4 कोटी रुपयांची बोली लावून दुबेला आपल्या ताफ्ता सहाभागीव केलं आहे. गेल्या सीझनमध्ये दुबे रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळला होता. परंतु, तो फारशी चांगली कामगिरी करु शकला नव्हता. शिवमने टीम इंडियासाठी एक वनडे आणि 10 टी20 इंटरनॅशनल सामने खेळले आहेत.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ख्रिस मॉरिस
साऊथ आफ्रिकेचा फास्ट बॉलिंग ऑलराउंडर ख्रिस मॉरिस आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू बनला आहे. ख्रिस मॉरिसला राजस्थान रॉयल्सने 16.25 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. याआधी आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बोली युवराज सिंह (16 कोटी) याच्यावर लावण्यात आली होती. मॉरिस यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघाचा हिस्सा होता. त्याला आयपीएल 2020 च्या लिलावात RCB ने 10 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं.
इंग्लंडचा ऑलराऊंडर मोईन अलीला चेन्नई सुपर किंग्सने सात कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं आहे. मोईन आयपीएल 2020 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा हिस्सा होता. परंतु, आता तो एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना दिसणार आहे. तसेच बांग्लादेशचा स्पिन ऑलराउंडर शाकिब अल हसनला कोलकाता नाईट रायडर्सने 3.20 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. शाकिब गेल्या वर्षी आयपीएलमध्ये खेळला नव्हता. शाकिबची बेस प्राइज 2 कोटी रुपये होती.
IPL Auction 2021 LIVE UPDATES : आयपीएलच्या लिलावासंदर्भातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर...
शाकिबच्या आधी ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला 14.25 कोटी रुपयांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने खरेदी केलं आहे. मॅक्सवेलला खरेदी करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर बंगलोर यांच्यात चढाओढ सुरु होती. परंतु, अखेर सर्वाधिक 14.25 कोटींची बोली लावून बंगलोरने मॅक्सवेलला आपल्या टीममध्ये घेतलं आहे.
अद्याप कोणते खेळाडू अनसोल्ड?
करुण नायर, केदार जाधव, जेसन रॉय आणि एलेक्स हेल्स यांसारख्या मोठ्या खेळाडूंना अद्याप कोणीही खरेदी केलेलं नाही. दरम्यान, दुसऱ्या सेटमध्ये या खेळाडूंवर बोली लावली जाऊ शकते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Glenn Maxwelln साठी CSK अन् RCB मध्ये चढाओढ; RCB ने मोजले तब्बल...