IPL Final, GT vs RR: राजस्थानच्या संघासाठी धोक्याची घंटा, राशिद खान करतोय 'स्नेक शॉट'चा सराव
IPL Final, GT vs RR: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील अंतिम सामना रविवारी गुजरात टायटन्स (GT) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात खेळला जाणार आहे.
IPL Final, GT vs RR: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील अंतिम सामना आज (29 मे 2022) गुजरात टायटन्स (GT) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात खेळला जाणार आहे. अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) होणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघ रणनीती बनवण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, गुजरातचा फिरकी गोलंदाज राशिद खान (Rashid Khan) विशेष तयारी करत आहे. राजस्थानविरुद्ध सामन्यापूर्वी राशिद खान स्नेक शॉटची प्रॅक्टिस करत आहे.
राशिद खान काय म्हणाला?
राजस्थानविरुद्ध सामन्यापूर्वी रशीद खाननं सांगितलं की, "स्नेक शॉटबाबत चाहत्यांकडून मला खूप विनंत्या आल्या आहेत आणि आयपीएलच्या अंतिम सामन्यात मला स्नेक शॉट खेळायचा आहे. मी जिथे प्रथम फलंदाजी करत होतो त्यापेक्षा थोडी वरच्या फळीवर फलंदाजी केली. दुसरी गोष्ट म्हणजे कोचिंग स्टाफ, कर्णधार आणि सर्व खेळाडूंनी दिलेला आत्मविश्वास! मी चांगली कामगिरी करू शकेन, असा त्याचा माझ्यावर विश्वास होता. एक खेळाडू म्हणून तुम्हाला हीच ऊर्जा हवी असते. प्ले-ऑफमध्ये माझी मानसिकता वेगळी नव्हती. विरोधी संघ माझ्याविरुद्ध सुरक्षित खेळ करताना दिसत आहेत. त्यामुळं भेदक आणि अचूक गोलंदाजी करण्याचा माझा प्रयत्न असेल. ज्यामुळं फलंदाजावर दबाव निर्माण होईल आणि संघाला विकेट मिळण्याची शक्यता आहे.
आयपीएल 2022 मधील राशिद खानची कामगिरी
आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये गुजरात टायटन्सनं राशिद खानला 15 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. राशिद खान आयपीएलच्या मागील हंगामात सनरायझर्स हैदराबादचा भाग होता. आयपीएलच्या चालू हंगामात रशीद खाननं गोलंदाजीसह फलंदाजीनंही कमाल दाखवली आहे. राशिदनं आतापर्यंत 15 सामन्यात 22.75 च्या सरासरीनं 18 विकेट्स घेतले आहेत.
राजस्थानविरुद्ध अष्टपैलू कामगिरी करण्यासाठी राशिद सज्ज
यंदाच्या हंगामात राशिद खानने दोन वेळा आपल्या फलंदाजीच्या जोरावर गुजरात टायटन्सला विजय मिळवून दिला आहे. राशिद खानच्या नावावर चालू हंगामात एकूण 91 धावांची नोंद आहे. राशिद खान राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात अष्टपैलू कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे.
हे देखील वाचा-
- Narendra Modi Stadium: जगातील सर्वात मोठं स्टेडियम! सर्वाधिक स्कोर, नामकरण आणि इतर महत्वाची माहिती
- IPL Final: आयपीएलच्या समारोप सोहळ्यात चमकणार बॉलिवूड तारे; कार्यक्रमाची वेळ, प्रमुख पाहुण्यांची यादी आणि इतर माहिती
- IPL 2022 Final, GT vs RR: अंतिम सामन्यात दवाचा प्रभाव जाणवणार? कोणासाठी अनुकूल असेल खेळपट्टी? पाहा पिच रिपोर्ट