एक्स्प्लोर

IPL 2022: राहुल तेवतियानं सामना फिरवला, गुजरातचा 6 विकेट्सनं विजय; लियाम लिव्हिंगस्टोन आक्रमक खेळी व्यर्थ

PBKS vs GT IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सोळाव्या सामन्यात गुजरातनं पंजाबला 6 विकेट्सनं पराभूत केलं आहे.

PBKS vs GT IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सोळाव्या सामन्यात गुजरातनं पंजाबला 6 विकेट्सनं पराभूत केलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजराजच्या संघानं पंजाबसमोर 190 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. सामना पंजाबच्या बाजूनं झुकलेला दिसत असताना सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या राहुल तेवतियानं अखेरच्या तीन चेंडूवर 13 धावा ठोकत गुजरातला विजय मिळवून दिलाय. 

नाणेफेक गमवल्यानंतर मैदानात आलेल्या पंजाबच्या संघाची सुरुवात खराब झाली. पंजाबनं दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर पहिली विकेट्स गमावली. त्यानंतर जॉनी बेअरस्टोनंही स्वस्तात माघारी परतला. दरम्यान, शिखर धवननं संयमी खेळी करत संघाचा डाव सावरला. पंजाबनं दोन विकेट्स गमवल्यानंतर मैदानात आलेल्या लियान लिव्हिंगस्टोननं आक्रमक फलंदाजी करत संघाचा स्कोर पुढे नेला. परंतु, दहाव्या षटकात राशीद खाननं शिखर धवनला बाद केलं. या सामन्यात ओडियन स्मिथ मोठी धावसंख्या उभी करेल, अशी अपेक्षा केली जात होती. परंतु, तो शून्यावर बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर सोळाव्या षटकात राशिद खानं  लिव्हिंगस्टोनला आक्रमक खेळी संपुष्टात आणली. अखेरच्या दोन षटकात फलंदाजी करत राहुल चहरनं 14 बॉलमध्ये 22 धावांची खेळी केली. तर, अर्शदीप सिंहनं पाच चेंडूत दहा धावा केल्या. ज्यामुळं पंजाबनं गुजरात समोर 190 धावांचं लक्ष्य ठेवलं. गुजरातकडून राशिद खाननं सर्वाधिक तीन विकेट्स मिळवल्या. तर, दर्शन नालकांडेनं दोन विकेट्स घेतल्या. मोहम्मद शामी, हार्दिक पांड्या, लॉकी फॅर्ग्युसन यांना प्रत्येकी दोन- दोन विकेट्स प्राप्त झाल्या. 

या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या गुजरातच्या संघानं चौथ्याच षटकात त्यांचा पहिला विकेट्स गमावला. मात्र, त्यानंतर सलामीवीर शुभमन गिलनं आक्रमक फलंदाजी करत संघाचा डाव पुढे नेला. दरम्यान, साई सुधरसननं त्याला चांगली साथ दिली. मात्र, पंधराव्या षटकात राहुल चहरनं साई सुधरसनच्या रुपात गुजरातला दुसरा झटका दिला. त्यानंतर शुभमन गिलनंही आपली विकेट्स गमावल्यानंतर संपूर्ण जबाबदारी कर्णधार हार्दिक पांड्याच्या खांद्यावर आली. परंतु, अखेरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर हार्दिकला रनआऊट करून पंजाबनं जोरदार कमबॅक केलं. पाच चेंडूत 18 धावांची गरज असताना राहुल तेवतिया मैदानात आला. हा सामना पंजाबच्या बाजूनं झुकलेला दिसत असताना त्यानं अखेरच्या चेंडूत 13 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. अखेरच्या दोन चेंडूत 12 धावांची गरज असताना त्यानं ओडियन स्मिथच्या गोलंदाजीवर दोन षटकार मारले. ज्यामुळं गुजरातच्या संघानं सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. पंजाबकडून कागिसो रबाडानं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तर, राहुल चहरला एक विकेट्स मिळाली.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majhi Ladki Bahin Yojana Form | माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा? A To Z प्रोसेसWorli Hit and Run Case : मासे घेऊन घरी येत असताना पत्नीला उडवलं, हुंदका आवरत पतीचा आक्रोशWorli Hit and Run Accident : वरळी अपघातातील गाडीचं परीक्षण करण्यासाठी RTO टीम दाखलSupriya Sule Meet Asha Pawar | अजित पवारांच्या घरी नाहीतर आशा काकींच्या घरी गेले होते- सुप्रिया सुळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
Embed widget