IPL 2022 : आयपीएलच्या बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव, दिल्लीचे फिजियो कोरोना पॉझिटिव्ह
Covid Outbreak in IPL : आयपीएलच्या 15 व्या हंगामावर कोरोनाचं संकट येण्याची शक्यता आहे. कारण आयपीएलच्या बायो बबलमध्ये कोरोनाने एन्ट्री केली आहे.
Covid Outbreak in IPL : आयपीएलच्या 15 व्या हंगामावर कोरोनाचं संकट येण्याची शक्यता आहे. कारण आयपीएलच्या बायो बबलमध्ये कोरोनाने एन्ट्री केली आहे. दिल्ली कॅपिटल्सचे (DC) फिजियो पॅट्रिक फरहार्ट यांना कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी आयपीएलने याबाबतची माहिती दिली आहे. पॅट्रिक फरहार्ट संध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत.
कोरोना महामारीमुळे आयपीएल 2021 चा हंगाम प्रभावीत झाला होता. चार मे 2021 रोजी आयपीएल अर्ध्यातूनच थांबवावी लागली होती. त्यानंतर उर्वरित आयपीएल सामने दुबईमध्ये घेण्यात आले होते. 2021 मध्ये सनराइजर्स हैदराबाद (SRH) चा विकेटकीपर ऋद्धिमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू अमित मिश्रा यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर आयपीएलचे सामने स्थगित कऱण्यात आले होते. 2021 मध्ये 29 लीग सामने झाल्यानंतर बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यानंतर बीसीसीआयने उर्वरित सामने दुबईमध्ये खेळवले होते. तर कोरोना महामारीमध्ये 2020 चा हंगामही दुबईत झाला होता.
दिल्लीचा पुढील सामना शनिवारी -
ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्लीचा पुढील सामना शनिवारी होणार आहे. दिल्लीने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. यापैकी दिल्लीला दोन सामन्यात विजय मिळवता आलाय. तर दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुणतालिकेत दिल्ली सातव्या क्रमांकावर आहे. दिल्लीचा पुढील सामना शनिवारी होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमर दिल्ली आरसीबी संघासोबत दोन हात करणार आहे.
हे देखील वाचा-
- Hardik Pandya: हार्दिक पांड्याच्या दुखापतीबाबत महत्वाची अपडेट्स, गुजरातचे चाहते चिंतेत
- Who Is Yash Dayal: पदार्पणाच्या सामन्यात गाजवलं मैदान! कोण आहे यश दयाल? ज्याच्यासमोर राजस्थानच्या फलंदाजांनी टेकले गुडघे
- Joe Root Steps Down: इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का! कर्णधार जो रूटनं घेतला सर्वात मोठा निर्णय