IPL 2022 : कधी आई-वडिलांना न सांगता खेळायला जायचा क्रिकेट; आता चेन्नई संघातून आयपीएल गाजवतोय
चेन्नई सुपरकिंग्स आज पुन्हा मैदानात उतरणार असून त्यांच्या समोर पंजाब किंग्स संघाचं आव्हान असणार आहे.
IPL 2022 : चेन्नई सुपरकिंग्स (CSK) संघाने यंदाच्या हंगामात खास कामगिरी केलेली नाही. त्यांनी 7 पैकी 5 सामने गमावले असून दोन सामनेच जिंकले आहेत. पण अशातच संघाला एक चांगला खेळाडू मिळाल्याचं समाधान आहे. हा खेळाडू म्हणजे चेन्नईचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी (Mukesh Chaudhary). चेन्नईचा स्टार खेळाडू दिपक चाहर दुखापतीमुळे संघाबाहेर असल्याने त्याच्या जागी नेट बोलर म्हणून संघात असणाऱ्या मुकेशला संधी मिळाली. ज्यानंतर आता मुकेश संघातील एक महत्त्वाचा गोलंदाज झाला असून त्याच्याकडून चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन होत आहे. दरम्यान मुकेश चौधरीचा प्रवासही अत्यंत रोमांचक आहे.
राजस्थानच्या छोट्या गावातून सुरु केला प्रवास
मुकेशचा जन्म राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्याच्या परदोदास गावात झाला. त्याला लहानपणीपासूनचं क्रिकटची फार आवड होती. बालपणीबद्दल बोलताना त्याने सांगितलं, लहानपणी गावातली मोठी पोरं गोलंदाजी किंवा फलंदाजी करायला देत नसत त्यामुळे दिवसभर फिल्डिंग करायला लागायची. तसंच घरची परिस्थिती खास नव्हती. जवळपास क्रिकेट क्लब किंवा चांगली शाळा नसल्याने त्याला बोर्डिंगमध्ये घातलं.
घरच्यांना न सांगता खेळायचा क्रिकेट
मुकेश नववीला असताना पुणे एका बोर्डिंग स्कूलमध्ये होता. त्यावेळी तो क्रिकेट खेळाला गंभीरपणे घेत असल्याचं त्याने घरी सांगितलं नव्हतं. पण एका स्पर्धेत यशानंतर त्याचं नाव न्यूजपेपरमध्ये आल्यानंतर त्याने याबाबत घरी सांगितलं. त्यावेळी त्याच्या वडिलांनी क्रिकेटसह अभ्यासतही लक्ष्य दे असं त्याला सांगितलं होतं. त्यानंतर त्याला महाराष्ट्र संघातून रणजी ट्रॉफी खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्याच्या घरातल्यांना तो चांगलं क्रिकेट खेळत असून त्यात गंभीर आहे याबाबत कळालं.
हे देखील वाचा-