लातुरात काँग्रेसकडून भाजपला 'दे धक्का'; संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांची मुलगी आघाडीवर
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या मतमोजणीत सुरुवातीचे कल स्पष्ट होत असून राजकीय समीकरणांची दिशा दिसू लागली आहे.

संभाजीनगर : राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल हाती येत असून छत्रपती संभाजीनगरसह (Sambhajinagar) मराठवाड्यातील 5 महापालिकेतील निकालात एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार वेगळेच फेरबदल दिसून येत आहेत. संभाजीनगर मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांकडून मोठा बंदबस्त लावण्यात आला आहे. त्यासोबत ड्रोन कॅमेराद्वारे पेट्रोलिंग अनाउन्समेंट केली जात आहे. मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड वाघाळा आणि लातूर महापालिकेच्या (Mahapalika) निवडणुकांसाठी निकाल जाहीर होत आहे. महापालिकेच्या पहिल्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार भाजपने संभाजीनगरमध्ये आघाडी घेतली आहे. लातूरमध्ये काँग्रेसने 16 जागी आघाडी घेतली आहे. भाजप 12 जागांवर आघाडीवर असून परभणीत ठाकरेंची शिवसेना 8 जागांसह आघाडीवर असून भाजप 2 तर काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या मतमोजणीत सुरुवातीचे कल स्पष्ट होत असून राजकीय समीकरणांची दिशा दिसू लागली आहे. एकूण ११५ जागांपैकी आतापर्यंत ३३ जागांचे निकाल जाहीर झाले असून, भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र आहे. भाजपने १२ जागांवर विजय मिळवला असून, सत्तास्थापनेच्या दृष्टीने पक्षाची स्थिती भक्कम होताना दिसत आहे. शिवसेनेने आतापर्यंत ६ जागा जिंकल्या आहेत, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला ५ जागांवर यश मिळालं आहे. एमआयएमनेही ५ जागांवर विजय मिळवत शहरातील आपली ताकद कायम ठेवली आहे. तर, काँग्रेसला ३ जागांवर आघाडी मिळाली आहे.
लातूरमध्ये काँग्रेसने 16 जागी आघाडी घेतली आहे, भाजप 12 जागांवर आघाडीवर आहे . तर, नांदेडमध्ये भाजप 24 जागांवर आघाडीवर असून शिवसेना 12 आणि काँग्रेसने 12 जागांवर आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. परभणीत शिवसेनेनं आघाडी घेतली असून 8 जागांवर शिवसेना आघाडीवर आहे. भाजप 2 आणि काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर आहे. जालन्यात भाजप 6 जागांवर आघाडीवर आले असून सध्यातरी मराठावाड्यातील निकालांच्या आकडेवारीनुसार मराठवाड्यात भाजपची लाट पाहायला मिळत आहे.
संजय शिरसाठ यांची मुलगी हर्षदा आघाडीवर
संभाजी नगर संजय शिरसाठ यांची मुलगी हर्षदा प्रभाग क्रमांक 18 मधून आघाडीवर तर मुलगा सिद्धांत शिरसाठही प्रभाग 29 मधून आघाडीवर
संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे रशीद मामु आघाडीवर आहेत.





















