एक्स्प्लोर

मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'

भाजपच्या तेजस्वी घोसाळकर यांनी सुरुवातीपासूनच आघाडीवर होत्या. दुसऱ्या फेरीअखेर तेजस्वी घोसाळकर यांना 11,964 मतं मिळाली होती

मुंबई : राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेत (Mahapalika) नेक राजकीय घडामोडी घडल्या असून निष्ठावंतांना संधी न मिळाल्याने मोठं नाराजीनाट्य देखील पाहायला मिळालं होतं. मुंबईच्या दहीसरमधील फेसबुक लाईव्ह खून प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या घोसाळकर कुटुंबात राजकीय फूट पडली. तेजस्वी घोसळकर (Tejaswi ghosalkar) यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपात केला आणि दहीसर वार्ड क्रमांक 2 मधून उमेदवारी मिळवली होती. त्यामुळे, दहीसर वार्ड क्रमांक 2 मधील निवडणुकीकडे मुंबईचे लक्ष लागले असून तेजस्वी घोसाळकर यांच्याविरुद्ध शिवसेनेनं त्यांच्याच मैत्रिणीला मैदानात उतरवलं होतं. मात्र, दहीसरच्या जनेतनं तेजस्वी घोसाळकरांना स्वीकारत मोठ्या मतांनी विजयी केलंय.

भाजपच्या तेजस्वी घोसाळकर यांनी सुरुवातीपासूनच आघाडीवर होत्या. दुसऱ्या फेरीअखेर तेजस्वी घोसाळकर यांना 11,964 मतं मिळाली होती, तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या धनश्री कोलेगे यांना 4115 मतं मिळाली होती. आता, दहीसरच्या वार्ड 2 मधून तेजस्वी घोसाळकर भरगोस मतांनी विजयी झाल्या आहेत. तेजस्वी घोसाळकर यांना 10755 मतांनी विजय मिळाला असून त्यांना एकूण 16,484 मतं मिळाली आहेत. तर, शिवसेनेच्या धनश्री कोलगे यांनी 5729 मतं घेतली आहेत.

मुंबईच्या दहिसर विधानसभेतील प्रभाग 2 मध्ये एकेकाळच्या मैत्रिणी असलेल्या तेजस्वी घोसाळकर विरुद्ध धनश्री कोलगे यांच्यात लढत होत आहे. मात्र, ही लढत निष्ठावंत विरुद्ध गद्दार, टीव्हीवरील चेहरा विरुद्ध रस्त्यावरील काम करणारा चेहरा, बाहेरचा उमेदवार विरुद्ध स्थानिक उमेदवार अशी लढत होणार असल्याचे धनश्री कोलगे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले होते.

धनश्री कोलगे कोण?

धनश्री कोलगे या युवा सेना कार्यकारिणी सदस्य असून दहीसरमधील वार्ड क्रमांक 2 मधून शिवसेना उबाठा पक्षाच्या उमेदवार आहेत. येथील वार्डमध्ये शिवसेना कार्यकर्ती म्हणून त्यांचं काम आहे. त्यांच्या याच कामाची दखल घेत पक्षाने त्यांना तेजस्वी घोसाळकर यांच्याविरुद्ध मैदानात उतरवलं आहे. माझ्या समोर जरी घोसाळकर कुटुंबीयांची सून असली तरी विनोद घोसाळकर यांचा आम्हाला पूर्ण पाठिंबा असून त्यांनी आमच्यावर कुठेही अविश्वास दाखवला नाही, असे मत शिवसेना ठाकरे गटाच्या प्रभाग दोन मधील उमेदवार धनश्री कोलगे यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे, विनोद घोसाळकर यांचाही त्यांच्या प्रचारात सहभाग पाहायला मिळत असून सुनेनं भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले होते. आता, मुंबई महापालिका निवडणुकीत विनोद घोसाळकर हे शिवसेना उबाठा पक्षासाठी काम करत आहेत, तर त्यांच्या सुनबाई तेजस्वी घोसाळकर ह्या भाजपाकडून निवडणूक लढवत आहेत.

तेजस्वी घोसाळकर कोण?

जस्वी घोसाळकर या शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आहेत. सन 2017 मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून प्रभाग क्रमांक 1 मधून तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या होत्या. तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तर माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई आहेत. अभिषेक घोसाळकर हे मुंबई बँकेचे संचालक होते. फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांचं वर्चस्व असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी तेजस्वी घोसाळकर यांची वर्णी लागली, त्याचवेळी त्यांचा भाजपामध्ये प्रवेश होऊ शकतो अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी भाजपात प्रवेश करुन उमेदवारी मिळवली.

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Results 2026: '...तर तुम्ही मुस्लिमांमध्ये आणखी 100 नेते निर्माण कराल'; नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीचा भाजपला इशारा, फहीम खानच्या पत्नीसह MIMचे सहा उमेदवार विजयी
'...तर तुम्ही मुस्लिमांमध्ये आणखी 100 नेते निर्माण कराल'; नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीचा भाजपला इशारा, फहीम खानच्या पत्नीसह MIMचे सहा उमेदवार विजयी
Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Results 2026: '...तर तुम्ही मुस्लिमांमध्ये आणखी 100 नेते निर्माण कराल'; नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीचा भाजपला इशारा, फहीम खानच्या पत्नीसह MIMचे सहा उमेदवार विजयी
'...तर तुम्ही मुस्लिमांमध्ये आणखी 100 नेते निर्माण कराल'; नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीचा भाजपला इशारा, फहीम खानच्या पत्नीसह MIMचे सहा उमेदवार विजयी
Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Embed widget