Hardik Pandya : तो परत आलाय! हार्दिक पांड्याचं भारतीय संघात पुनरागमन, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मैदान गाजवायला सज्ज
IND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात 9 जून पासून पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार असून या सामन्यांसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे.
IND vs SA, T20 Series : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvsSA) यांच्यातील 5 टी20 सामन्यांच्या मालिकेला 9 जूनपासून सुरुवात होणार आहे. यासाठी बीसीसीआयने नुकतीच संघाची घोषणा केली आहे. यावेळी कर्णधारपद केएल राहुलला मिळालं असलं तर संघात स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्याचं (Hardik Pandya) पुनरागमन झाल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. भारतीय संघात सद्यस्थितीला सर्वात दमदार ऑलराऊंडर असताना खराब फॉर्ममुळे संघाबाहेर गेलेल्या हार्दिकने सध्या सुरु असलेल्या आयपीएल 2022 मध्ये दमदार कामगिरी केल्यामुळे त्याला पुन्हा संघात संधी मिळाली आहे.
सध्या हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स (Gujrat Titans) संधाचं कर्णधारपद सांभाळत आहे. गुजरातचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी असून प्लेऑफमध्ये जाणारा पहिला संघ आहे. यावेळी हार्दिकनेही दमदार कामगिरी केली आहे. कर्णधारपदाला साजेशी खेळी हार्दिकने पर्वात केल्याने त्याला आता भारतीय संघातही संधी मिळाली आहे.
हार्दिकची आयपीएल 2022 मधील कामगिरी
यंदा हार्दिक एक उत्तम कर्णधार म्हणून खेळत असून खेळाडू म्हणूनही चांगली कामगिरी करत आहे. गुजरात टायटन्सकडून (GT) खेळताना हार्दिक पांड्याने 13 सामन्यात 413 रन केले आहेत. यावेळी त्याची सरासरी 41.30 असून स्ट्राइक रेट 131.52 इतका आहे. यावेळी त्याने 4 अर्धशतकं ठोकली असून 87 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तो उत्तमप्रकारे गोलंदाजी देखील करत आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ
केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यांचे वेळापत्रक
सामना | दिनांक | ठिकाण |
पहिला टी20 सामना | 9 जून | अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली |
दुसरा टी20 सामना | 12 जून | बाराबती स्टेडियम, कट्टक |
तिसरा टी20 सामना | 14 जून | डॉ वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम,विशाखापट्टणम |
चौथा टी20 सामना | 17 जून | सौराष्ट्र क्रिकेट असोसीएशन स्टेडियम, राजकोट |
पाचवा टी20 सामना | 19 जून | एम. चिन्नस्वामी स्टेडियम बंगळुरु |
हे ही वाचा -
- IND Vs SA: भारत- दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वी आयसीसीची मोठी कारवाई, 'या' क्रिकेटवर लावली 9 महिन्यांची बंदी!
- Team India Squad against South Africa : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ जाहीर, केएल राहुलकडे कर्णधारपद तर उम्रान मलिकला संधी
- ENG vs IND: इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा; पुजाराचं पुनरागमन