एक्स्प्लोर

IND Vs SA: भारत- दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वी आयसीसीची मोठी कारवाई, 'या' क्रिकेटवर लावली 9 महिन्यांची बंदी!

IND Vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात 9 जून पासून पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे.

IND Vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात 9 जून पासून पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी क्रिडाविश्वाला हादरून टाकणारी माहिती समोर आली आहे. डोपिंग टेस्टमध्ये (Doping Test) दोषी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज झुबेर हमजावर (Zubayr Hamza) आयसीसीनं (ICC) मोठी कारवाई केली आहे. या वर्षी 17 जानेवारी रोजी त्याची डोपिंग टेस्ट करण्यात आली होती. त्याचा निकाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर आयसीसीनं हमजाला 9 महिन्यांसाठी निलंबित केलंय. 

नेमकं प्रकरण काय?
खेळाडू चांगल्या कामगिरीसाठी अनेकदा औषधांचं सेवन करतात. या गोष्टी रोखण्यासाठी जगभरात सर्व प्रकारचे खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची नियमितपणे डोपिंग टेस्ट केली जाते. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतील पार्ल येथील स्पर्धेदरम्यान झुबेर हमजाची डोपिंग टेस्ट करण्यात आली होती. ज्यात तो दोषी आढळल्यानंतर आयसीसीनं त्याला  9 महिन्यांसाठी निलंबित केलं. हमजावर 22 मार्च 2022 पासून बंदी घालण्यात आलीय. जी 22 डिसेंबर 2022 पर्यंत सुरू राहणार आहे. यासह 17 जानेवारी ते 22 मार्च 2022 पर्यंतची त्यांची वैयक्तिक कामगिरी अवैध ठरवण्यात आलीय. 

हमजाच्या एकदिवसीय कारकिर्दीतून 31 धावा रद्द
हमजाने दक्षिण आफ्रिकेसाठी आतापर्यंत सहा कसोटी आणि एक एकदिवसीय सामना खेळला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 212 धावांची नोंद आहे. न्यूझीलंडविरुद्ध त्यानं एकमेव एकदिवसीय सामना खेळला आहे. ज्यात त्यानं 31 धावांची खेळी केली होती. या 31 धावा त्याच्या रेकॉर्डमधून कापल्या जातील.

हमजाची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये हमजानं उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली. त्यानं 78 सामन्यांच्या 130 डावांमध्ये 46 च्या सरासरीनं 5 हजार 271 धावा केल्या आहेत. ज्यात 13 शतकं आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यानं 39 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यानं नाबाद 222 धावांची सर्वात मोठी खेळी खेळलीय.

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

PAK vs ENG :  दहाव्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी, 154 वर 9 विकेट गेल्यानंतरही मैदान सोडलं नाही, पाकिस्तानच्या विजयाचा हिरो शादाब खाननं इतिहास भूगोल बदलून टाकला
154 वर 9 विकेट गेल्या, मॅच संपल्यात जमा, शादाब खाननं 10 व्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी करत क्रिकेटचा इतिहासच बदलला 
जगात कोणीही बरोबरी करु न शकणारे भारतीय संघाचे तीन दिग्गज, विरोधी संघाला सळो की पळो करुन सोडतायेत 
जगात कोणीही बरोबरी करु न शकणारे भारतीय संघाचे तीन दिग्गज, विरोधी संघाला सळो की पळो करुन सोडतायेत 
NZ vs IND T20 : सलग दोन पराभवांनंतर न्यूझीलंडचा मोठा निर्णय! 'हा' खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर, टीम इंडियाशी लढण्यासाठी संघात मोठे बदल
सलग दोन पराभवांनंतर न्यूझीलंडचा मोठा निर्णय! 'हा' खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर, टीम इंडियाशी लढण्यासाठी संघात मोठे बदल
26 सामने, 26 विजय! न्यूझीलंडविरुद्ध धडाकेबाज खेळी, तिलक वर्माचा मोठा विक्रम, जाणून घ्या सविस्तर माहिती 
26 सामने, 26 विजय! न्यूझीलंडविरुद्ध धडाकेबाज खेळी, तिलक वर्माचा मोठा विक्रम, जाणून घ्या सविस्तर माहिती 

व्हिडीओ

NCP Finance Ministry : अर्थखातं राष्ट्रवादी मिळणार? मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली?Special Report
Vivek Padit Majha Katta : आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे विवेक पंडित माझा कट्ट्यावर
Mann Suddha Tujha Season 3 : गवताची पेंढी | मन सुद्ध तुझं | Episode 4 | ABP Majha
Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PAK vs ENG :  दहाव्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी, 154 वर 9 विकेट गेल्यानंतरही मैदान सोडलं नाही, पाकिस्तानच्या विजयाचा हिरो शादाब खाननं इतिहास भूगोल बदलून टाकला
154 वर 9 विकेट गेल्या, मॅच संपल्यात जमा, शादाब खाननं 10 व्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी करत क्रिकेटचा इतिहासच बदलला 
Aadhaar Email Update : आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार
आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार
Mumbai Indians : हार्दिक पांड्यानं साथ सोडल्यास मुंबई इंडियन्सचा पुढील कॅप्टन कोण? हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला थेट RCB च्या कोचचा सपोर्ट  
हार्दिक पांड्यानं साथ सोडल्यास मुंबई इंडियन्सचा पुढील कॅप्टन कोण? हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला कुणाकडून पसंती?
Gold Price :  ऑगस्ट महिन्यातील उच्चांकावरुन चांदी 56000 रुपयांनी स्वस्त, सोने दरात 23000 रुपयांची घसरण, सोने चांदीचे दर कशामुळं कोसळले?  
सोने चांदीचे दर कशामुळं कोसळले? ऑगस्टमधील उच्चांकाच्या तुलनेत सोनं 23 हजारांनी स्वस्त
Loan : जगातील अनेक देश कर्जात अडकले, अमेरिका, फ्रान्स ते भारतापर्यंत कोणत्या देशांवर किती कर्ज? सर्वाधिक कर्ज 'या' देशावर
जगातील बडे देश कर्जाच्या जाळ्यात अडकले, अमेरिका, फ्रान्स ते भारतापर्यंत कोणावर किती कर्ज?
Gold Silver Rate : चार दिवसांमध्ये चांदीचे दर गडगडले, चांदीचे दर 16000 रुपयांनी घसरले, सोन्याचे दर कोसळले
चार दिवसांमध्ये चांदीचे दर गडगडले, चांदीचे दर 16000 रुपयांनी घसरले, सोन्याचे दर कोसळले
अरुणाचल प्रदेशात NHPC कार्यालय, पोलीस ठाणे पेटवलं; भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदाराच्या घराची सुद्धा तोडफोड, अनेक पोलीस जखमी, सियांग प्रकल्पाला कडाडून विरोध
अरुणाचल प्रदेशात NHPC कार्यालय, पोलीस ठाणे पेटवलं; भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदाराच्या घराची सुद्धा तोडफोड, अनेक पोलीस जखमी, सियांग प्रकल्पाला कडाडून विरोध
Donald Trump: अमेरिका आज इराणवर हल्ला करणार? ट्रम्प म्हणाले, आम्हाला एका मोठ्या कराराची आशा, इराणने अण्वस्त्रे बनवू नयेत अशी आमची इच्छा
अमेरिका आज इराणवर हल्ला करणार? ट्रम्प म्हणाले, आम्हाला एका मोठ्या कराराची आशा, इराणने अण्वस्त्रे बनवू नयेत अशी आमची इच्छा
Embed widget