(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2025 Auction : मराठमोळ्या Ajinkya Rahaneला मिळणार केकेआर संघाचे कर्णधारपद? सीईओ म्हणाले....
यंदा आयपीएल 2025 साठी मेगा लिलाव आयोजित करण्यात आला होता. जिथे अनेक बड्या खेळाडूंवर बोली लावण्यात आली.
Ajinkya Rahane KKR IPL 2025 Auction : यंदा आयपीएल 2025 साठी मेगा लिलाव आयोजित करण्यात आला होता. जिथे अनेक बड्या खेळाडूंवर बोली लावण्यात आली होती. लिलावाच्या दुसऱ्या दिवशी सर्व संघांनी आपापला संघ पूर्ण केला. सर्व संघांच्या पर्समध्ये काही रक्कम शिल्लक होती. लिलावादरम्यान अनेक संघ कर्णधाराच्या शोधात होते, तर काही संघांनी आधीच आपले कर्णधारपद कायम ठेवले आहे.
लिलावानंतर जवळपास सर्वच संघांचे कर्णधारपदाचे चित्र स्पष्ट झाले आहे. ज्यामध्ये गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सनेही आपली टीम पूर्णपणे तयार केले आहे, परंतु त्यांच्याकडे कमांडरची कमतरता आहे. म्हणजेच केकेआरला आपला परिपूर्ण कर्णधार सापडला नाही.
आता प्रश्न असा आहे की, पुढील वर्षी कोलकाता नाईट रायडर्सचा नवा कर्णधार कोण असेल? केकेआरसाठी कर्णधारपदासाठी काही नावे समोर आली आहेत, ज्यामध्ये भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे कर्णधार म्हणून दिसत आहे. केकेआरने या खेळाडूला शेवटच्या क्षणी 1.50 कोटी रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले.
Amader Knights for #IPL2025, Kolkata! 💜 pic.twitter.com/xZO19jkbPN
— KolkataKnightRiders (@KKRiders) November 25, 2024
रहाणे होणार KKRचा पुढचा कर्णधार?
श्रेयस अय्यरच्या बाहेर पडल्यानंतर गतविजेत्या संघासमोर आगामी हंगामात कोणता खेळाडू संघाची धुरा सांभाळणार हा मोठा प्रश्न आहे. मेगा लिलावात केकेआरने रहाणेला 1.75 कोटी रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले. अजिंक्य रहाणे पर्पल आर्मीचा कर्णधार बनण्याची शक्यता असताना, फ्रँचायझीचे सीईओ वेंकी म्हैसूर याबद्दल स्पष्टपणे बोलले आहेत. रहाणेबाबत कोणताही निर्णय संघ व्यवस्थापनाच्या बैठकीतच घेतला जाईल, असे त्याने सांगितले.
Eden awaits you once again, Ajju Bhai! 💜 pic.twitter.com/X3ot9bF9jm
— KolkataKnightRiders (@KKRiders) November 26, 2024
ब्रॉडकास्टरशी बोलताना कोलकाता नाइट रायडर्सचे सीईओ वेंकी म्हैसूर यांनी कर्णधारपदाच्या प्रश्नावर सांगितले की, प्रामाणिकपणे सांगायचे तर आपण एकत्र बसून यावर विचार करायला हवा. अनेक वेळा या गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करावा लागतो. मोठ्या लिलावात संघाचे अनेक भागीदार आणि थिंक टँक सदस्य उपस्थित नव्हते, त्यामुळे सर्वजण एकत्र बसून सविस्तर चर्चा करतील. विचारविनिमय केल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला झाली.
केकेआर आयपीएल 2025 संघ :
रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन, आंद्रे रसेल, हर्षित राणा, रमणदीप सिंग, व्यंकटेश अय्यर, क्विंटन डी कॉक, रहमानउल्ला गुरबाज, ॲनरिक नॉर्टजे, आंग्रिश रघुवंशी, वैभव अरोरा, मयंक मार्कंडे, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, ला स्पेन्सर, जॉन्सन, ला. सिसोदिया, अजिंक्य रहाणे, अनुकुल रॉय, मोईन अली, उमरान मलिक.