Ravindra Jadeja: चेन्नईच्या पराभवानंतर कर्णधार रवींद्र जाडेजा झाला भावूक, म्हणाला...
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जची आतापर्यंत निराशाजनक कामगिरी राहिली आहे.
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जची आतापर्यंत निराशाजनक कामगिरी राहिली आहे. मुंबईच्या ब्रेबोर्न स्डेडियमवर पंजाबविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात चेन्नईच्या संघाला 54 धावांनी पराभव पत्कारावा लागला. या पराभवानंतर चेन्नईचा कर्णधार रवींद्र जाडेजा भावून झाला. चेन्नईच्या संघाला फक्त एका विजयाची प्रतिक्षा आहे. एक सामना जिंकल्यानंतर संघ विजयाचा वेग पकडेल. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असं रवींद्र जाडेजानं म्हटलंय.
रवींद्र जाडेजा काय म्हणाला?
जाडेजा म्हणाला की, "टी-20 क्रिकेटमध्ये ही एक मॅचची गोष्ट आहे. जर तुम्ही एक सामना जिंकला तर तुम्ही विजयाचा वेग पकडाल. एक विजय आम्हाला योग्य मार्गावर आणेल आणि आम्हाला गती देईल. आमचे सर्व खेळाडू अनुभवी आहेत. अनुभवी. कोणत्याही खेळाडूला काहीही सांगण्याची गरज नाही. प्रत्येकाला त्यांचा खेळ कसा आहे? हे माहित आहे. त्यासाठी आम्ही खूप मेहनत घेत आहोत. खेळाडूंना पाठिंबा देणे महत्त्वाचे आहे. कारण ते सर्व सामने विजेते आहेत. आमच्याकडे 4-5 भारतीय वेगवान गोलंदाज आहेत. आम्ही त्यांना सपोर्ट करत आहोत. एक- दोन सामन्यात पराभव झाल्यानंतर खेळाडूंना प्रश्न विचारू शकत नाही. आम्हाला त्यांना सपोर्ट करावा लागेल", असंही रवींद्र जाडेजानं म्हटलं आहे.
ख्रिस जॉर्डनचं चेन्नईच्या संघात खेळण्याचं स्वप्न पूर्ण
चेन्नईच्या संघासाठी दोन विकेट्स घेऊन संघाला चांगली सुरुवात करून देणारा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डननं म्हणाला की, "एमएस धोनीसोबत खेळणे खूप आनंददायक होते. चेन्नईच्या संघात खेळलं माझं स्वप्न होतं, ते साकार झालं.
चेन्नईच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद
मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या IPL 2022 च्या 11व्या सामन्यात पंजाब किंग्जनं चेन्नई सुपर किंग्जचा 54 धावांनी पराभव केला. चेन्नई सुपर किंग्जचा हा सलग तिसरा पराभव आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईला स्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.
हे देखील वाचा-
- IPL 2022 : केएल राहुलचे शिलेदार लढणार केन विल्यमसनच्या सेनेशी, 'या' खेळाडूंवर असेल सर्वांची नजर
- SRH vs LSG : जाणून घ्या हैदराबाद विरुद्ध लखनौ सामन्यातील कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती?
- WWE Wrestle Mania : Roman Reigns ने Brock Lesnar ला धूळ चारली, 38 व्या WWE चॅम्पियन्सशिपवर नाव कोरलं
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha