IPL 2020, KKR vs CSK : आज आयपीएलच्या मैदानात कोलकाता विरूद्ध चेन्नई भिडणार, कोण बाजी मारणार?
आयपीएल 2020 मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आबुधाबी येथील मैदानावर सामना रंगणार आहे.
IPL 2020, KKR vs CSK : आयपीएल 2020 मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना रंगणार आहे. आज आबुधाबी येथील मैदानावर शेख जायद स्टेडियममध्ये होणाऱ्या सामन्यात कोलकाताच्या संघातील दिग्गज खेळाडूंवर उत्तम कामगिरी करण्याचा दबाव असेल. तसेच सलग तीन सामन्यांमध्ये पराभव झाल्यामुळे आपल्या फॉर्ममध्ये वापसी केलेला चेन्नईच्या संघाचाही कस लागणार आहे. जाणून घेऊया दोन्ही संघांची आतापर्यंतची कामगिरी...
कोलकाता नाईट रायडर्स
कोलकाता नाईट रायडर्सचा आयपीएलमधील आतापर्यंतचा प्रवास तसा समतोल राखणारा आहे. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरूद्ध पराभव झाल्यानतंर हैदराबाद आणि राजस्थानच्या विरोधातील सामन्यांमध्ये विजय मिळवला. परंतु, गेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरोधातील सामन्यात मात्र केकेआरला परभावाचा सामना करावा लागला होता. तसेच संघातील बड्या खेळाडूंचं प्रदर्शन अद्याप फारसं खास असल्याचं दिसून आलेलं नाही.
चेन्नई सुपर किंग्स
चेन्नई सुपर किंग्सने आपल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर मात करत विजय मिळवला होता. परंतु, त्यानंतरच्या सलग तीन सामन्यांमध्ये परभाव झाल्याने संघा आयपीएलच्या पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानी पोहोचला होता. पण त्यानंतर मागील सामन्यात चेन्नईने धमाकेदार कामगिरी केली. आयपीएल 2020 च्या 18 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने किंग्ज इलेव्हन पंजाबला 10 गडी राखून पराभूत केलं. तसेच संघातील स्टार खेळाडू शेन वॉटसन-फाफ ड्यू प्लेसिसने अभेद्य सलामी दिली.
चेन्नई सुपर किंग्सचा संभाव्य संघ
महेंद्र सिंह धोनी (कर्णधार, विकेटकीपर), अंबाती रायडू, फाफ डू प्लेसिस, शेन वॉटसन, केदार जाधव, ड्वेन ब्रावो, रविंद्र जडेजा, दीपक चहर, पीयुष चावला, शार्दुल ठाकुर आणि सॅम कुर्रन
कोलकाता नाइट राइडर्सचा संभाव्य संघ
दिनेश कार्तिक (कर्णधार आणि विकेटकीपर), आंद्रे रसेल, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, नितीश राणा, शिवम मावी, शुभमन गिल, सुनील नारेन, पँट कमिन्स, इयोन मोर्गन आणि वरुण चक्रवर्ती.
महत्त्वाच्या बातम्या :
IPL 2020 : राजस्थानविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहची कमाल; पर्पल कॅपच्या शर्यतीत प्रबळ दावेदार