All England Open Badminton : लक्ष्य सेनची विजयी घोडदौड सुरुच, मलेशियन खेळाडूला मात देत गाठली अंतिम फेरी
All England Open Badminton : विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदाकाची कमाई करणाऱ्या लक्ष्य सेन याने त्याची विजयी घोडदौड सुरुच ठेवली आहे. ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत तो फायनलमध्ये पोहोचला आहे.
![All England Open Badminton : लक्ष्य सेनची विजयी घोडदौड सुरुच, मलेशियन खेळाडूला मात देत गाठली अंतिम फेरी Indias Lakshya Sen beats Lee Zii Jia of Malaysia and enters mens singles final of All England Badminton Championship 2022 All England Open Badminton : लक्ष्य सेनची विजयी घोडदौड सुरुच, मलेशियन खेळाडूला मात देत गाठली अंतिम फेरी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/25/01f0ee64bcb1b05fbeef4edef0439a9c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
All England Open Badminton : ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत (All England Badminton Championship 2022) भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन (Lakshya Sen) याने त्याची विजयी घोडदौड सुरुच ठेवली असून नुकताच तो अंतिम फेरीत (Final) पोहोचला आहे. लक्ष्य सेन याने डिफेनडींग चॅम्पियन मलेशियाच्या ली झी झिया (Lee Zii Jia of Malaysia) याला मात देत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. याआधी त्याचा प्रतिस्पर्धी लू गुआंग जू मैदानात न उतरल्याने तो सामना न खेळताच सेमीफायनलमध्ये पोहोचला होता.
त्यानंतर आज (19 मार्च) त्याचा सामना मलेशियाच्या ली झी झिया याच्या विरुद्ध होता. या सामन्यातील विजेता खेळाडू थेट अंतिम फेरीत पोहोचणार होता. अशा वेळी दोघांमध्ये हा सामना चांगलाच अटीतटीचा झाला. पहिला सेट लक्ष्यने 21-13 च्या फरकाने जिंकत सामन्यात आघाडी घेतली. पण दुसऱ्या सेटमध्ये ली याने पुनरागमन करत 12-21 च्या फरकाने सेट जिंकत बरोबरी घेतली. पण अखेरचा सेट लक्ष्याने 21-19 अशा अटीतटीच्या फरकाने नावावर करत सामनाही खिशात घातला. त्यामुळे लक्ष्यला थेट अंतिम फेरीचं तिकीट मिळालं आहे.
सात्विक-चिराग मात्र बाहेर
भारताचे सुपरस्टार खेळाडू सात्विकसाईराज आणि चिरागची जोडी जगातील नंबर एकची जोडी, इंडोनेशियाचे मार्कस फर्नाल्डी गिडियन आणि केविन संजया सुकामुलजो यांच्याकडून 24-22, 21-17 अशा दोन सेट्समध्ये पराभूत झाले. ज्यामुळे त्यांना स्पर्धेबाहेर पडावे लागले आहे. हा सामना जवळपास 47 मिनिटं चालला होता.
हे देखील वाचा-
- Kapil Dev : भारताचे महान ऑलराऊंडर कपिल देव यांचा आवडता ऑलराऊंडर खेळाडू माहित आहे का?
- Virat Kohli : कोहलीसोबत सेल्फी घेण्यासाठी चाहते मैदानात, पुढे विराटने जे केले ते तुम्हीच पाहा
- IND vs SL Test : श्रेयस अय्यरची दमदार कामगिरी, अर्धशतक ठोकत नवा रेकॉर्ड केला नावावर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)