Kapil Dev : भारताचे महान ऑलराऊंडर कपिल देव यांचा आवडता ऑलराऊंडर खेळाडू माहित आहे का?
1983 विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांना भारताच्या इतिहासातील सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडू म्हटलं जातं. दरम्यान त्यांचा आवडता अष्टपैलू खेळाडू भारतीय संघातील असा खेळाडू आहे, जो फलंदाज आणि गोलंदाजीतच नाही तर क्षेत्ररक्षणातही अव्वल आहे.
Kapil Dev : भारताचे महान क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार कपिल देव यांना भारताचे सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखलं जातं. दरम्यान त्यांचा आवडता अष्टपैलू खेळाडू हा म्हणजे रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja). जाडेजा कोणत्याी परिस्थितीत दबावाखाली न खेळता, दमदार कामगिरी करत असल्याने कपिल यांचा जाडेजा आवडता अष्टपैलू खेळाडू आहे.
मला रवींद्र जाडेजाचा खेळ आवडतो - कपिल देव
फरीदाबादमधील सर्वोदय रुग्णालयात एका समारंभादरम्यान आले असताना कपिल देव म्हणाले,"मला नव्या क्रिकेटपटूंच्या खेळामध्ये रवींद्र जाडेजाचा खेळ सर्वाधिक आवडतो. कारण तो कधीच दबावाखाली खेळतो असं वाटत नाही, तो खेळाचा आनंद घेत असतो. त्यामुळेच तो गोलंदाजीसह फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही उत्तम कामगिरी करतो." याशिवाय आवडत्या मैदानाबाबत बोलताना कपिल देव म्हणाले, ''चेन्नईचं एमए चिदंबरम स्टेडियम त्यांचं आवडतं मैदान आहे. कारण त्याच ठिकाणी त्यांनी 11 टेस्टमध्ये दो शतकांसह 707 रन आणि 40 विकेट्स मिळवले होते.
जाडेजा 'In Form'
श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत जाडेजाने आतापर्यंच 100 हून अधिकच्या सरासरीने धावा करत 10 विकेट्सही घेतल्या आहेत. यामुळे तो सध्याच्या टेस्ट रँकिंगमध्ये नंबर एकचा ऑलराउंडर बनला आहे. पहिल्या कसोटीत तर जाडेजाने एकहाती खेळी केली. त्याने नाबाद 175 रन करत 87 धावांच्या बदल्यात 9 विकेट्स घेतल्या. ज्यामुळे भारताने सामना मोठ्या फरकाने जिंकला.
हे देखील वाचा-
- IND vs SL : रोहित शर्माच्या षटकाराने प्रेक्षकाचं नाक फुटलं; हाड फ्रॅक्चर, टाकेही घातले
- Virat Kohli : कोहलीसोबत सेल्फी घेण्यासाठी चाहते मैदानात, पुढे विराटने जे केले ते तुम्हीच पाहा
- IND vs SL Test : श्रेयस अय्यरची दमदार कामगिरी, अर्धशतक ठोकत नवा रेकॉर्ड केला नावावर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha