Indian Premier League : 'प्रत्येक पाकिस्तानी क्रिकेटरला आयपीएल खेळण्याची इच्छा'; टीम इंडियाच्या नावानं कायम शिमगा करणाऱ्या पाकिस्तानमधून अखेर आवाज आलाच!
नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबई हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग उघड झाल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध संपवले. पाकिस्तानसोबतच्या चर्चेपासून व्यापारापर्यंत सर्व काही जवळपास संपले होते.
Indian Premier League Pakistan Players : क्रिकेट जगतामधील सर्वाधिक धनाढ्य स्पर्धा असलेली इंडियन प्रिमियर लीग अर्थात आयपीएल स्पर्धा खेळण्याची प्रत्येक क्रिकेटपटूची इच्छा असते. या स्पर्धेनं अनेकांनी आपल्या प्रतिभेची छाप पाडली असून त्यामुळे राष्ट्रीय संघाची संधी सुद्धा चालून आली. त्यामुळे या स्पर्धेत खेळण्याचा मोह पाकिस्तान क्रिकेटपटूंना का होणार नाही? हे साहजिक आहे. आता याबाबत थेट बोलण्याचं धाडस वेगवान गोलंदाज हसन अलीनं केलं आहे.
'प्रत्येक खेळाडूला आयपीएल खेळायचं आहे'
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली आयपीएलमध्ये खेळण्याची मनोकामन आहे. त्याने स्वतः एका मुलाखतीत हे मान्य केले. हसन अलीने एक दिवस आयपीएल खेळण्याची इच्छा असल्याचे म्हटले आहे. 'समा लाउंज'वर बोलताना हसन अली म्हणाला की, 'प्रत्येक खेळाडूला आयपीएल खेळायचे आहे आणि मलाही त्या लीगमध्ये खेळायचे आहे. ती जगातील सर्वात मोठ्या लीगपैकी एक आहे. भविष्यात मला संधी मिळाली, तर मी तिथे नक्कीच खेळेन.
Hasan Ali said "Every player wants to play IPL & it is my wish to play there. It is one of the biggest leagues in the world and I will definitely play there if there is an opportunity in the future". [Samaa Lounge] pic.twitter.com/pKRjSDh9kh
— Johns. (@CricCrazyJohns) November 27, 2023
IPL 2008 मध्ये पाक क्रिकेटपटू खेळले
आयपीएलच्या पहिल्या सत्रात पाकिस्तानचे अनेक खेळाडू सहभागी झाले होते. या यादीत शोएब मलिक, शोएब अख्तर, कामरान अकमल, सोहेल तन्वीर आणि शाहिद आफ्रिदीसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. 2008 च्या या मोसमात पाकिस्तानी खेळाडूंनी खूप धमाल केली होती. सोहेल तन्वीरने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. तो पर्पल कॅपचा विजेता होता. मात्र, या हंगामानंतरच पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएल खेळण्यास बंदी घालण्यात आली होती.
मुंबई हल्ल्याने दरवाजे बंद केले
नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबई हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग उघड झाल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध संपवले. पाकिस्तानसोबतच्या चर्चेपासून व्यापारापर्यंत सर्व काही जवळपास संपले होते. आयपीएलमध्येही पाकिस्तानी खेळाडूंचा विरोध होता, त्यानंतर आयपीएल समितीला पाकिस्तानी क्रिकेटपटूंना आयपीएल खेळण्यावर बंदी घालावी लागली होती. तेव्हापासून आतापर्यंत पाकिस्तानी खेळाडूंनी आयपीएलमध्ये भाग घेतलेला नाही.
हसन अली हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी संघाचा भाग
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाकिस्तानला जाणाऱ्या कसोटी संघात हसन अलीचा समावेश करण्यात आला आहे. 30 नोव्हेंबरला तो ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. सध्या तो पाकिस्तान संघाच्या सराव शिबिरात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या तयारीच्या उद्देशाने हे शिबिर सुरू करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या