एक्स्प्लोर

India vs Afghanistan : टीम इंडिया उद्या अफगाणिस्तानशी दोन हात करणार; वेळ, ठिकाण, टीम अपडेट अन् लाइव्ह स्ट्रीमिंग कोठे पाहता येईल?

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या लढतीत भारताची दोन षटकांत 3 बाद 5 अशी स्थिती झाली होती. त्यामुळे रोहित शर्मा, संधी मिळाल्यास इशान किशन आणि चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या श्रेयस अय्यरवर मोठा दबाव असणार आहे.

नवी दिल्ली : वर्ल्डकपच्या सलामीच्या सामन्यात ( ICC Cricket World Cup 2023) अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत विराट कोहली आणि के. एल. राहुलने केलेल्या दमदार फलंदाजीने टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला मात दिली होती. त्यामुळे उद्याच्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध (India vs Afghanistan) दोन हात करताना फलंदाजी सुधारण्यावर टीम इंडियाचे लक्ष असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या लढतीत भारताची दोन षटकांत 3 बाद 5 अशी स्थिती झाली होती. त्यामुळे सलामीवीर कप्तान रोहित शर्मा, संधी मिळाल्यास इशान किशन आणि चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या श्रेयस अय्यरवर मोठा दबाव असणार आहे. सलामीवीर शुभमन गिल अफगाणविरुद्धच्या सामन्यालाही मुकणार आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध उतरलेला संघ मैदानात उतरेल की नाही? फलंदाजीत बदल केला जाणार की नाही? याकडेही लक्ष असेल.  

बांगलादेशविरुद्धच्या दारुण पराभवानंतर, अफगाणिस्तानचे दिल्लीमध्ये परिस्थिती बदलण्याचे लक्ष्य असेल. दिल्लीच्या लाजपत नगरमध्ये मोठ्या संख्येने अफगाण रहिवासी असल्याने खेळाडूंना चांगला पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे. मुख्यत: फिरकीपटू ही अफगाणिस्तानची गेल्या काही वर्षांपासून मजबूत फळी आहे. प्रभाव पाडायचा असेल तर त्यांच्या फलंदाजांनीही सुधारणा आवश्यक आहे. सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज हा एकमेव फॉर्मात आहे. बांगलादेशविरुद्ध 156 धावांचा सर्वबाद झाल्याने फलंदाज तत्काळ सुधारणा करण्याचा प्रयत्न करतील.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना तारीख, वेळ आणि ठिकाण

भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना उद्या बुधवार, 11 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होईल. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होईल.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान: एकदिवसीय सामन्यांमध्ये रेकॉर्ड

खेळलेले सामने - 3, भारताने जिंकले - 2, अफगाणिस्तान -0, बरोबरीत-1

टीव्हीवर IND vs AFG कशी पाहता येईल?

भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर असेल 

ऑनलाइन मॅच कशी पाहाल?

Disney+ Hotstar वर भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना त्यांच्या अॅप आणि वेबसाइटवर पाहता येईल

भारताचा संघ

रोहित शर्मा (कप्तान), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर.

अफगाणिस्तान संघ

हशमतुल्ला शाहिदी (कप्तान), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमातुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी, अब्दुल रहमान, नवीन उल हक.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Embed widget