India vs West Indies 2nd ODI Live Updates: भारत विरुद्ध वेस्ट इंडीजमधील दुसऱ्या सामन्यात भारत विजयी, 44 धावांनी जिंकला सामना
India vs West Indies 2nd ODI Live Updates: दुसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ मालिकेवर कब्जा करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

Background
India vs West Indies 2nd ODI Live Updates: भारत आणि वेस्ट इंडीज (IND Vs WI) यांच्यात आज अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्डेडिअमवर (Narendra Modi Stadium) दुसरा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ मालिकेवर कब्जा करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर, निकोलस पूरन (Nicholas Pooran) वेस्ट इंडीच्या संघाची कमान संभळणार आहे. आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजचा डाव 176 धावांत गुंडाळला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या 60 धावांच्या जोरावर भारताने सहा विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला होता.
संघ-
भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, प्रसीध कृष्णा
वेस्ट इंडीजचा संघ:
शाई होप (विकेटकिपर), ब्रँडन किंग, डॅरेन ब्राव्हो, शमारह ब्रूक्स, निकोलस पूरन (कर्णधार), जेसन होल्डर, अकेल होसेन, फॅबियन ऍलन, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ, केमार रोच
- हे देखील वाचा-
- IND vs WI, 2nd ODI: आज भारत, वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा वनडे सामना, के एल राहुलचे संघात पुनरागमन
- IPL 2022 : कर्णधार हार्दिक पांड्याच्या संघाचं नाव ठरलं!
- IND vs WI, 2nd ODI : भारताला मालिका विजयाची संधी, तर वेस्ट इंडिज बरोबरीसाठी लढणार, कधी, कुठे पाहाल सामना?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
[yt]https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA[/yt]
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारत 44 धावांनी विजयी
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने 237 धावा केल्यानंतर वेस्ट इंडिजला 193 धावांत सर्वबाद करत सामना जिंकला आहे. शिवाय मालिकेतही 2-0 ची विजयी आघाडी घेतली आहे.
सामना रंगतदार स्थितीत
सामना सध्या रंगतदार स्थितीत असून भारताला विजयासाठी दोन विकेट्सची गरज असून वेस्ट इंडिजला 64 चेंडूत 79 धावांची गरज आहे.























