एक्स्प्लोर

IND vs WI, 2nd ODI: आज भारत, वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा वनडे सामना, के एल राहुलचे संघात पुनरागमन

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज होत आहे. या सामना जिंकून भारत मालिका खिशात घालणार की वेस्ट इंडिज बरोबरी साधणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

IND vs WI, 2nd ODI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज होत आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका आहे. यामध्ये पहिल्या सामन्यात भारताने संघाने वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला होता. त्यामुळे आजचा सामना जिंकून भारताला मालिका खिशात घालण्याची संधी आहे. तर वेस्ट इंडिजला 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्याचे आव्हान आहे. दरम्यान, या सामन्यात  चाहत्यांच्या नजरा या संघात पुनरागमन करणाऱ्या उपकर्णधार के एल राहुलच्या फलंदाजी क्रमावर असणार आहेत.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजचा डाव 176 धावांत गुंडाळला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या 60 धावांच्या जोरावर भारताने सहा विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला होता. दुसरा वनडे सामना सुरू होण्यापूर्वी के एल राहुलचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. तर मयांक अगरवाल देखील निवडीसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात कोण करणार हा प्रश्न संघ व्यवस्थापकांसमोर आहे. पहिल्या वनडे सामन्यात के एल राहुल उपलब्ध नव्हता. त्यामुळे ईशान किशन डावाची सुरुवात करण्यासाठी आला होता. मागच्या सामन्यात ईशान किशनने रोहित शर्मा सोबत डावाची सुरुवात करत भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. पहिल्या गड्यासाठी दोघांमध्ये 84 धावांची भागीदारी झाली होती. यादरम्यान ईशान किशनने 28 धावांची खेळी केली होती.

चहल आणि वॉशिंग्टन यांनी गोलंदाजीत चांगली कामगिरी केली. आज फिरकीपटू कुलदीप यादवला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, पहिल्या सामन्यातील पराभव विसरून वेस्ट इंडिजच्या नजरा चांगल्या कामगिरीवर असणार आहेत. गेल्या 16 सामन्यांमध्ये रविवारी 10 व्यांदा वेस्ट इंडिजचा संघ पूर्ण 50 षटकेही खेळू शकला नाही. त्यामुळे पोलार्डच्या नेतृत्वाखालील संघाला सुधारणा करावी लागणार असून, फलंदाजांना जबाबदारीने खेळावे लागणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप! 7 खेळाडू बाहेर केल्यानंतर आता आणखी एका निवडकर्त्याची होणार हकालपट्टी; पडद्यामागे नेमकं चाललंय काय?
पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप! 7 खेळाडू बाहेर केल्यानंतर आता आणखी एका निवडकर्त्याची होणार हकालपट्टी; पडद्यामागे नेमकं चाललंय काय?
Duleep Trophy Final : वैभव सूर्यवंशीचं वादळ रोखण्यासाठी कर्णधार तिलकने लावली तगडी फिल्डिंग, खतरनाक गोलंदाजीची थेट टीममध्ये एन्ट्री; तर पडिक्कलचीही निवड
वैभव सूर्यवंशीचं वादळ रोखण्यासाठी कर्णधार तिलकने लावली तगडी फिल्डिंग, खतरनाक गोलंदाजीची थेट टीममध्ये एन्ट्री; तर पडिक्कलचीही निवड
Why BCCI Ban Rohit Yadav : BCCIने आधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी निवड केली, पण एक चूक भोवली; रोहित यादववर थेट 2 वर्षांची बंदी, नेमकं काय घडलं?
BCCIने आधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी निवड केली, पण एक चूक भोवली; रोहित यादववर थेट 2 वर्षांची बंदी, नेमकं काय घडलं?
India vs Japan T20 Match : आशियाई गेम्सपूर्वी BCCIची मोठी घोषणा; जपानविरुद्ध पहिल्यांदाच ऐतिहासिक टी-20 सामना, कधी-कुठे होणार मॅच?
आशियाई गेम्सपूर्वी BCCIची मोठी घोषणा; जपानविरुद्ध पहिल्यांदाच ऐतिहासिक टी-20 सामना, कधी-कुठे होणार मॅच?

व्हिडीओ

Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
Beed Crime: शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
Air India: गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
People at Work 2026: फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
Embed widget