एक्स्प्लोर

India vs Sri Lanka: शिखर धवननं रचला इतिहास, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या वनडेत केले हे विक्रम, गांगुलीचाही विक्रम मोडीत

India vs Sri Lanka: भारत आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय सामन्यांच्या वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतानं सात विकेट्सनं विजय मिळवला. या विजयासह कर्णधार शिखर धवननं अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत

India vs Sri Lanka:  भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतानं सात विकेट्सनं विजय मिळवला. या विजयासह भारतीय कर्णधार शिखर धवननं अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. धवननं या सामन्यात पहिल्यांदा कर्णधारपद सांभाळलं आणि नाबाद 86 धावा करत काही विक्रमही आपल्या नावे केले. त्यानं माजी कर्णधार सौरव गांगुलीचा एक विक्रम मोडीत काढला.  

धवनच्या सहा हजार धावा पूर्ण

धवनने  86 धावांची खेळी करता सहा चौकार आणि एक षटकार लगावला. या बरोबरच धवनने वन डे क्रिकेटमध्ये 6000 धावा पूर्ण करण्याचा टप्पा पार केला. धवनने 6000 धावाचा टप्पा गाठताना धवनने वेस्ट इंडिजचे सर विवियन रिचर्ड आणि इंग्लंडचा कर्णधार जो रुट यांना मागे टाकले आहे.तो 6 हजार धावा करणारा 13 वा भारतीय खेळाडू बनला. या यादीत भारताच्या सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, विरेंद्र सहवाग, गौतम गंभीर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, युवराज सिंह, सुरेश रैना आणि मोहम्मद अझहरुद्दीन या नावांचा समावेश आहे. 

Ind Vs SL, 1 ODI : भारताचा श्रीलंकेवर सात विकेट्सने विजय, शिखर धवन विजयाचा शिल्पकार

सर्वात वेगवान 6 हजार धावा 
शिखर धवननं 140 इनिंग्समध्ये 6 हजार धावा केल्या. त्यानं  सौरव गांगुलीचं रेकॉर्ड मोडीत काढलं. गांगुलीनं 147 इनिंग्समध्ये   6000 धावा केल्या होत्या. तर विराट कोहलीने 136 इनिंग्समध्ये  6000 धावा केल्या होत्या. विराटनंतर सर्वात वेगवान 6000 धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज शिखर धवन आहे. सर्वात जलद सहा हजार धावा पूर्ण करण्याचे रेकॉर्ड दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमलाच्या नावावर आहे. आमलाने फक्त 123 सामन्यातच हा विक्रम केला आहे. आमलानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारताचा कर्णधाप विराट कोहलीचा (136 सामने) क्रमांक लागतो. आणि तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन (139 सामने) आहे.

सर्वात वयस्कर कर्णधार
शिखर धवननं श्रीलंकेविरुद्ध कर्णधारपद सांभाळलं. तो सर्वात वयस्कर भारतीय कर्णधार ठरला आहे.  धवन वय आता 35 वर्ष 225 दिवस इतकं आहे. याआधी मोहिंदर अमरनाथ 34 वर्ष 37 दिवस वय असताना कर्णधार बनले होते. शिखरनं 37 वर्ष जुनं रेकॉर्ड मोडलं आहे.  

भारताने श्रीलंकेवर सात विकेट्सने विजय मिळवला 
श्रीलंकेवर भारताने श्रीलंकेवर सात विकेट्सने विजय मिळवला आहे. श्रीलंकेने भारतासमोर  262  धावांचे आव्हान समोर ठेवले होते.  हे आव्हान भारताने 36. 4 षटकात 3 विकेट गमावून पूर्ण केले.  भारताचा कर्णधार शिखर धवनने 95 चेंडूमध्ये नाबाद 86 धावांची खेळी करत संघाचा विजय सोपा केला. इशान किशन 59 आणि पृथ्वी शॉ ने 43 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने नाबाद 31 धावा केल्या. भारताने हा सामना जिंकत मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली आहे.   

त्याआधी श्रीलंकेने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेनं 50 षटकात 262 धावा केल्या. पृथ्वी शॉ (43 रन, 24  बॉल, 9 चौकार), शिखर धवन (नाबाद 86 रन, 95 बॉल, 6 चौकार, 1 षटकार),  ईशान किशन (59 रन, 42 बॉल, 8 चौकार, 2 षटकार), मनीष पांडे (25 रन, 40 बॉल, 1 चौकार, 1 षटकार) आणि सूर्यकुमार यादव (नाबाद 31 रन, 20 बॉल, 5 चौकार) जोरावर हे आव्हान भारताने 36. 4 षटकात 3 विकेट गमावून पूर्ण केले. श्रीलंकेकडून धनंजय सिल्वाने दोन गडी बाद केले. तर भारताकडून दीपक चहर, कुलदीप यादव आणि चहल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. दुसरी वन डे 20 जुलैला खेळवण्यात येणार आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
Embed widget