Virat Kohli : प्रतीक्षा देवाच्या पराक्रमाच्या बरोबरीची, पण किंग कोहलीनं फिफ्टी करत सचिनाच सर्वात मोठा पराक्रम मोडला!
Virat Kohli : कोहलीने अर्धशतक करतानाच आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पंधराशे धावांचा टप्पा पार केला. हा टप्पा पार करणारा हा दुसराच भारतीय खेळाडू ठरला.
Kolkata : वर्ल्डकपमधील प्रत्येक सामन्यांमध्ये विक्रमांवर विक्रम रचत चाललेल्या किंग विराट कोहलीने आज बर्थडेला सुद्धा निराश न करता दमदार अर्धशतकी खेळी केली. या खेळीमुळे टीम इंडियाच्या डावाला आकार आला. दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर कोहली आणि श्रेयसने संघाचा डाव सावरला.
KING KOHLI BECOMES THE FIRST ASIAN TO COMPLETE 500 RUNS IN THIS WORLD CUP...!!! pic.twitter.com/jMdFJDsWK0
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 5, 2023
दोघांनी दमदार खेळी केली. कोहलीने अर्धशतक करतानाच आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पंधराशे धावांचा टप्पा पार केला. हा टप्पा पार करणारा हा दुसराच भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी ही कामगिरी फक्त ब्लास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाच करता आली आहे.
Virat Kohli completes 6,000 ODI runs in India at an average of 60.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 5, 2023
- The 🐐 pic.twitter.com/IWfCsD2Ym9
त्याचबरोबर आणखी एक पराक्रम विराट कोहलीने आपल्या नावे या सामन्यामध्ये केला. त्यांने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तब्बल 60 च्या सरासरीने 6000 धावा पूर्ण केल्या. या पराक्रमातून खेळाडूची प्रतिभा काय आहे ते लक्षात येते.
FIFTY BY KING KOHLI...!!!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 5, 2023
6th fifty plus score in 8 innings in this World Cup - the GOAT is looking for a big one on his birthday. pic.twitter.com/Il85IRzHKp
वर्ल्डकपमध्ये कोहलीची बॅटिंग दमदार झाली आहे. मागील आठ डावांमध्ये सहापेक्षा अधिकवेळा त्याने अर्धशतकाहून अधिक धावा केल्या आहेत.
King Kohli completes 1,500 runs in the ICC Cricket World Cup.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 5, 2023
- Only 2nd Indian after Sachin Tendulkar to achieve this feat. pic.twitter.com/22IUiqywvI
आजच्या सामन्यामध्ये श्रेयसने मागील सामन्यातील कामगिरी सुरूच ठेवताना दमदार अर्धशतक झळकावले. त्यामुळे दोघांनी टीम इंडियाला 200 च्या पार नेले.
Historic.
— Johns. (@CricCrazyJohns) November 5, 2023
Virat Kohli becomes the 3rd highest run getter in World Cup history....!!!!! pic.twitter.com/IN1GEh3lTv
इतर महत्वाच्या बातम्या