India vs New Zealand : डॅरेल मिशेलच्या शतकी तडाख्यानंतर शमी पुन्हा संकटात धावून आला; दोन विकेट घेतल्याने टीम इंडियाची वापसी
पहिल्या दहा ओव्हरमध्ये भारताने न्यूझीलंडवरती वर्चस्व गाजवल्यानंतर पुढील 20 षटकांमध्ये भारताला विकेटसाठी घनघोर संघर्ष करावा लागला.
India vs New Zealand : टीम इंडियाने 4 बाद 397 धावांचा डोंगर रचल्यानंतर न्यूझीलंडने प्रतिआक्रमण करत सामन्यात रंगत भरली आहे. मोहम्मद शमीने सुरुवातीला दोन धक्के दिल्यानंतर न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन आणि डॅरेन मिशेलने नांगर सेमीफायनलच्या लढतीत नांगर टाकला आहे. न्यूझीलंडने 33व्या षटकात 3 बाद 220 अशी मजल मारली आहे. न्यूझीलंडने भारतीय फिरकीचा समर्थपणे सामना केला. केन विल्यमसनला तब्बल तीन जीवदान मिळाल्याने टीम इंडियासमोर आव्हान किंचित वाढले असतानाच पुन्हा एकदा शमी धावून आला. त्याने जीवदान दिलेल्या विल्यमसनला आणि टाॅम लॅथमला बाद केले.
Daryl Mitchell smashed the biggest six of this World Cup. pic.twitter.com/UoIORor9NV
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 15, 2023
टीम इंडियाने 400 च्या जवळपास धावा केल्यानंतर न्यूझीलंडकडून सुद्धा काउंटर अटॅक सुरू झाल्याने टीम इंडियासह मैदानातही सन्नाटा पसरला. केन विल्यमसनला सलग तीन जीवदान मिळाल्याने टीम इंडिया बॅकफूटवर दिसत होती. मात्र, शमीचे 33वं षटक निर्णायक ठरले. पहिल्या दहा ओव्हरमध्ये भारताने न्यूझीलंडवरती वर्चस्व गाजवल्यानंतर पुढील 20 षटकांमध्ये भारताला विकेटसाठी घनघोर संघर्ष करावा लागला आहे. मात्र, विकेट हाती लागली नाही.
Fifty by Kane Williamson....!!!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 15, 2023
A great return for Kane after recovering from an injury, the captain is still at the crease for New Zealand in the Semis. pic.twitter.com/X9Rs5U2Mqo
न्यूझीलंडकडून केन विल्यम्सन आणि मिशेल यांनी घनाघाती फलंदाजी करत भारतीय गोलंदाजीवर नियंत्रण ठेवले. मिशेल सर्वाधिक भारतासाठी डोकेदुखी ठरला असून त्याने शतकी खेळी केली. त्यामुळे न्यूझीलंडच्या सेमीफायनलमधील अशा अजूनही कायम आहेत.
Fifty by Daryl Mitchell.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 15, 2023
A half century in 49 balls - the big match player for New Zealand. He's going well in the Semi Finals. pic.twitter.com/om2pyd7yVY
इतर महत्वाच्या बातम्या