Shreyas Iyer : मुंबईकर श्रेयस अय्यरच्या 'हिटमॅन' स्टाईलला कोहलीचा ग्रँड सॅल्युट! वर्ल्डकपमध्ये केला भीम पराक्रम
Shreyas Iyer : श्रेयस अय्यरने सलग दुसऱ्या सामन्यात शतकाचा टप्पा ओलांडला. मात्र, विश्वचषकात सलग दोन शतके करणारा श्रेयस अय्यर हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.
मुंबई : भारतीय संघाने वर्ल्डकपच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 50 षटकांत 4 गडी गमावून 197 धावा केल्या. भारताकडून विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने शतके झळकावली. विराट कोहलीने 113 चेंडूत 117 धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने 70 चेंडूत 105 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 8 षटकार मारले.
Virat Kohli said, "Shreyas Iyer deserves a lot of credit for the way he batted and the score we posted after Shubman got cramps". pic.twitter.com/zfUM8847ci
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 15, 2023
श्रेयस अय्यरने सलग दुसऱ्या सामन्यात शतकाचा टप्पा ओलांडला. मात्र, विश्वचषकात सलग दोन शतके करणारा श्रेयस अय्यर हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा पराक्रम राहुल द्रविडने केला होता. 1999 च्या विश्वचषकात राहुल द्रविडने सलग 2 शतके झळकावली होती.
SHREYAS IYER SCORES THE FASTEST EVER CENTURY IN A WORLD CUP SEMI FINALS...!!!! pic.twitter.com/j8qytKHWKe
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 15, 2023
श्रेयस अय्यरने सलग दुसरे शतक झळकावले
एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर श्रेयस अय्यरने नेदरलँडविरुद्ध शतक झळकावले. या सामन्यात श्रेयस अय्यरने 94 चेंडूत 128 धावा केल्या होत्या. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 5 षटकार मारले. आता श्रेयस अय्यरने न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावून इतिहास रचला आहे. याआधी विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. 113 चेंडूत 117 धावा करून विराट कोहली टीम साऊथीचा बळी ठरला.
HUNDRED IN 67 BALLS BY SHREYAS IYER...!!!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 15, 2023
The Semi Finals against New Zealand and Iyer has played his best game at the Wankhede. This is world class batting by Shreyas. pic.twitter.com/EQC4dP0yhc
विराट कोहलीच्या वनडे कारकिर्दीतील हे 50 वे शतक आहे. अशाप्रकारे विराट कोहली वनडे इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे.
भारताचे न्यूझीलंडला 398 धावांचे लक्ष्य
याआधी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या शतकांशिवाय शुभमन गिलच्या शानदार खेळीमुळे भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर 398 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. शुभमन गिल 66 चेंडूत 80 धावा करून नाबाद परतला. याशिवाय केएल राहुलने 20 चेंडूत 39 धावा करत शानदार पूर्ण केले. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर ट्रेंट बोल्टने 1 बळी घेतला.
Well played, Shreyas Iyer...!!!
— Johns. (@CricCrazyJohns) November 15, 2023
105 runs from just 70 balls in the Semis, the hero of the middle order, the best number 4 in ODIs currently. pic.twitter.com/14xr5ZiwoC
इतर महत्वाच्या बातम्या